HomeBreaking Newsपालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा दौरा...

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा दौरा…

चंद्रपूर, दि. 4 फेब्रुवारी : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दिनांक 4 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 12 वा. सिंचाई विश्रामगृह, सावली येथे गडचिरोलीहून आगमन व राखीव. दु. 3 वा. स्थानिक कार्यक्रमास राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली येथे उपस्थिती. सायं. 5 वा. सावली येथून गडचिरोलीकडे प्रयाण.

दि. 5 फेब्रुवारी 2021 रोजी स. 11 वा. नियोजन भवन चंद्रपूर येथे गडचिरोलीहून आगमन व राखीव. स. 11.15 वा. कर्नाटक एम्हा कंपनीच्या प्रकल्पबाधित / पुनर्वसन संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृह येथे आढावा बैठक. दु. 12.30 वा. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना दिलेल्या निधीच्या संदर्भात संबंधीत अधिकाऱ्यांची वीसकलमी सभागृह येथे आढावा बैठक. दु. 2 वा. गारमेंट क्लस्टर, ब्रम्हपूरीच्या संदर्भात वीसकलमी सभागृह येथे आढावा बैठक. दु. 2.30 ते 3 राखीव. दु. 3 वा. चंद्रपूर वरून घुघ्घुसकडे प्रयाण. दुपारी 3.20 वा. एस.एस.सी. सिमेंट कंपनीस भेट व कंत्राटी कामगार समस्या आणि पर्यावरणा संदर्भात प्राप्त तक्रारीबाबत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत बैठक. सायं. 5 वा. घुघ्घुस वरून गडचिरोलीकडे प्रयाण.

दि. 6 फेब्रुवारी 2021 रोजी स. 11 वा. कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही, येथे गडचिरोलीहून आगमन व कृषी संशोधन केंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन समारंभ कार्यक्रमास उपस्थित. दु. 12.30 वा. सिंदेवाही शासकीय विश्राम गृह येथे आयोजित सभेस उपस्थिती दु. 2.30 ते 3 वा. राखीव. सायं. 4 वा. सिंदेवाही वरून नागपूरकडे प्रयाण.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!