नवविवाहित तरुणीची आत्महत्या; विवाहाला झाले होते अवघे आठ दिवस

0
1099

चंद्रपुर: अवघे लग्नाला आठ दिवस लोटले नाही आणि नवविवाहितेने टोकाचे पाऊल उचलुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही घटना सोमवारी रात्री 8.30 वाजता च्या दरम्यान पडोली येेथे घडली. भारती अंबादास अंबादे असे आत्महत्या करणाऱ्या नवविवाहितेचे नाव आहे. पती-पत्नी दोघेही भंडारा जिल्ह्यातील असून गेल्या २४ जानेवारीला त्याचे लग्न झाले होते.

पडोलीला दोघेही भाड्याने रूम करून राहत होते. सोमवारी पती ड्युडीवर गेल्यावर ती एकटीच खोलीमध्ये होती. कुणीही नसल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनतर घटनास्थळी पडोली पोलिस दाखल होऊन शव शवविच्छेदनाकरीता पाठविला.
शवविच्छेदनानंतर मृत्यूदेह भंडारा येथील घरी नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आला. परंतू आत्महत्येचे नेमके कारण कळले नसून पुढील तपास पडोली पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here