शिधापत्रिकेसोबत आधार कार्डची नोंदणी करा; पुरवठा अधिकारी संघपाल मेश्राम यांचे आवाहन

675

गोंडपिपरी:- केंद्र शासनाने राष्ट्रीय सुरक्षा अन्न योजनेअंतर्गत शिधापत्रिकासोबत मोबाईल व आधार सिडींग करण्याचा निर्णय घेतला आहे.वितरण प्रणालीसाठी हा महत्वाचा प्रकल्प आहे.त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकांनी शिधापत्रिकेसोबत आधार कार्डची नोंदणी करावी असे आवाहन गोंडपिपरीचे पुरवठा अधिकारी संघपाल मेश्राम यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या सुचनेनुसार सध्या संपुर्ण राज्यभर शिधापत्रिकांसोबत आधार कार्ड नोंदणी करण्याचे काम सुरू आहे.यासाठी आधार कार्डची अदयापही नोेंदणी न केलेल्या लाभाथ्र्यांना रास्तभाव दुकान निहाय यादी तयार करून त्यांच्या मार्फतीने ई पास उपकरणातील ई केवायसी व मोबाईल क्रमांक जोडण्याचे काम पुर्ण करण्याचे उदिष्टय आहे.याकरिता प्रशासनाच्या वतीने तहसिलदार के.डी.मेश्राम यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात जागृती मोहिम राबविण्यात आली.

तालुका प्रशासन व रास्त धान्य दुकानाच्या मार्फतीने वारंवार सुचना देउन अनेकांनी शिधापत्रिकेसोबत अदयापही आधार कार्डची नोंदणी केली नाही.येत्या 31 जानेवारी 2021 पर्यत आधार कार्डची शिधापत्रिकेसोबत नोंदणी न केल्यास लाभाथ्र्यानंा आधार कार्डची नोंदणी होईपर्यत अन्नधान्यापासून वंचित राहावे लागणार आहे.हि सर्व स्थिती लक्षात घेता लाभाथ्र्यांनी तातडीने आपल्या शिधपत्रिकेसोबत आधार कार्डची नोंद करावी असे आवाहन गोंडपिपरीचे पुरवठा अधिकारी संघपाल मेश्राम यांनी केले आहे.