छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिजाऊ जन्मोत्सव साजरा…

337

चंद्रपुर- चंद्रपुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. सतीश मालेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात ही माँसाहेब जिजाऊच्या प्रतिमेला मालार्पण करून झाली.
प्रा.सतीश मालेकर यांनी माँसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सर्वाना शुभेच्छा देऊन दोन्ही महापुरुषांना अभिवादन केले. सिनेअभिनेता अक्षय लोणारे यांनी जिजाऊ जमोत्सव गावागावात, चौकाचौकात आणि घराघरात व्हायला हवा. त्याचप्रमाणे आपल्या मुलांना महापुरुषांची माहिती लहानपणापासून द्यायला हवी असे आवाहन केले.
यावेळी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल प्रलय मशाखेत्री, काव्यलेखन स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल युवाकवी-लेखक सुरज दहागावकर, गॉड पॉवर जिमचे संचालक खेमराज हिवसे सर, पॉवरलिफ्टिंग व बॉडी बिल्डर स्पर्धेत गोल्ड मेडलिस्ट साहिल जुमडे, सायकल मार्च योद्धे प्रा. अनिल डहाके,शंकर मसराम, सिनेअभिनेता अक्षय लोणारे त्याचप्रमाणे ओबीसी समन्वयक गौरव पिंपळशेंडे आणि अमोल मोरे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी इंजि. राजेश पोलेवार, प्रा.अनिल डहाके, VBVP चे जिल्हाध्यक्ष मयूर पाऊणकर, इंजि.विक्रांत टोंगे, प्रा.महेश बावणे,खुशाल काळे, बाबा भसारकर, नीलय धोटे, सुग्रीव मोरे, गजानन सावलीकर, बंडू मोहितकर, ताराचंद धोपटे, महेश मालेकर, खिल्लारे आणि समस्त उपस्थित बांधवांनी सहकार्य केले…