जय संघर्ष संस्थेचे अध्यक्ष संजय हाळनोर यांना निळे प्रतीक राज्य समाज भूषण पुरस्कार जाहीर…

627

औरंगाबाद: प्रतिनिधि

जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेची निळे प्रतीक बहू उद्दोशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद. संस्थापक अध्यक्ष श्री रतनकुमार साळवे साहेब यांनी निळे प्रतीक हा राज्य स्तरीय समाज भूषण 2021 पुरस्कारसाठी आपल्या संस्थेची निवड केलेली आहे.
जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था हि प्रवासातील प्रवासी व वाहन चालक, चालक मालक ह्यांच्या हितार्थ मदतीचे कार्य करते आहे.जात,पात,धर्म ,प्रांत ,दिवस की रात्र ह्याचा विचार न करता मागील चार वर्षा पासुन फक्त मदतीचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिनांक 14 जानेवारी रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते संस्थेस सम्मानित करण्यात येणार आहे.ड्रायव्हर बांधवांसाठी आरोग्य शिबिरे,रक्तदान शिबिरे, वाहतूक विषयी मार्गदर्शन करणे, अपघाताला आळा बसावा मणुन गाड़ी नियंत्रीत वेग मरियादेवर चालवणे,नशा पाणी न करणे, झोप येत आसेल तर विश्रांती घेणे .अशा अनेक विषयांवर जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर साहेब वेळोवेळी, वेगवेगळ्या ठिकाणी मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करतात. जय संघर्ष संस्था हि महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर कार्यरत आहे.तसेच देशभरातील सर्व पर्यटन व धार्मिक स्थळी सक्रिय आसुन देशा बाहेर नेपाळ मधे पण संस्थेचे सदस्य मदतीस सक्रिय आहेत.
निळे प्रतीक या पुरस्काराचे मानकरी खरे तर जय संघर्ष ग्रुपचे तळागाळातील सर्व सदस्य व पदाधिकारी हे आहेत.ह्या पुरस्काराची निमंत्रणपत्रिका संस्थेला प्राप्त झाली आहे असे प्रदेश अध्यक्ष श्री प्रवीण वाघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे.