जिल्हास्तरीय निबंधस्पर्धेत प्रलय म्हशाखेत्री याचे सुयश…राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसाठी निवड…

0
145
Advertisements

चंद्रपूर: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था(महाज्योती) नागपूर तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रलय म्हशाखेत्रीने सुयश मिळविले आहे.

त्यांने भारतीय स्त्रीवादी विचारवंत सावित्रीबाई फुले या विषयावर निबंध लिहून आयोजकाकडे पाठविला होता. सदर स्पर्धेचा निकाल जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून निकाल घोषित करण्यात आला. यात प्रलयने द्वितीय क्रमांक पटकावला व त्याची राज्यस्तरीय निबंधस्पर्धेसाठी निवड झाली आहे.
प्रलयच्या यशाबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.सतीश मालेकर, इंजि. राजेश पोलेवार, प्रा.अनिल डहाके, VBVP चे जिल्हाध्यक्ष मयूर पाऊणकर, खुशाल काळे, सुरज दहागावकर, इंजि.विक्रांत टोंगे, प्रा.महेश बावणे, अक्षय लोणारे, खेमराज हिवसे, साहिल जुमडे, बाबा भसारकर, विपुल धोटे, सुग्रीव मोरे, गजानन सावलीकर, बंडू मोहितकर, ताराचंद धोपटे, महेश मालेकर, खिल्लारे आदी उपस्थित होते.
निर्धे पुकरस्कार वितरण सोहळा येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी सन्माननिय पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पोलीस ग्राउंड वर होईल. प्रलयच्या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. प्रलयने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मार्गदर्शक आणि मित्र परिवाराला दिले आहे.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here