गोंडपिपरी-बल्लारपूर महामार्गावर सायकलस्वाराची बसला धडक; सायकलस्वाराचा जागीच मृत्यू…

2815

शेखर बोनगीरवार (जिल्हा प्रतिनिधी)

गोंडपीपरी: आज सायंकाडी ७ च्या सुमारास करंजी येथील एम.आय.डी.सी च्या समोर सायकल स्वाराची व बस ची जबर धडक झाली त्यात सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला.

तालुक्यातील करंजी येथील भैयाजी मोहूर्ले वय (३७) हे नेहमी प्रमाणे आकसापूर रोड ला एम.आय.डी.सी च्या दिशेने जात होते समोरून बस येत होती समोरासमोर धडक झाल्याने सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला.
भैयाजी विठलं मोहूर्ले यांच्या पच्यात एक मुलगा ,एक मुलगी ,पत्नी,आई वडील असा बराच मोठा आप्त परिवार आहे.घटनास्थळी जाऊन गोंडपीपरीचे ठाणेदार संदिप धोबे व पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहे.