भंडारा-गोंदिया जिल्ह्यात ५ जानेवारीला ‘मेट्रो संवाद’

0
131

भंडारा/गोंदिया : नागपूर मेट्रोचे आकर्षण केवळ नागपूरच नाही तर विदर्भवासीयांना आहे. विदर्भातून नागपुरात विविध कामाने येणाऱ्या नागरिकांना मेट्रोची संपूर्ण माहिती मिळावी या उद्देशातून विदर्भातील विविध जिल्ह्यात ‘मेट्रो संवाद’चे आयोजन करण्यात येत आहे. याच मालिकेत ५ जानेवारी रोजी गोंदिया, भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी मेट्रो संवाद होणार आहे.

Advertisements

सकाळी १० वाजता भंडारा विश्रामगृह, ११.३० वाजता साकोली, १.३० वाजता अर्जुनी मोरगाव, ३.३० वाजता सडक अर्जुनी आणि सायंकाळी ५ वाजता सुभाष गार्डन गोंदिया येथे मेट्रो संवाद होईल.

Advertisements

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोमध्ये काय काळजी घेण्यात येत आहे, कुठल्या मार्गावर किती स्थानकांवर मेट्रो थांबते, मेट्रो स्थानकाचे वैशिष्ट्य काय, सेलिब्रेशन ऑन व्हील ही काय संकल्पना आहे, आदींबाबत सविस्तर माहिती नागरिकांना करून देण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन नागपूर मेट्रोच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here