जिल्हा संपादक प्रशांत शाहा
चामोर्शी: चामोर्शी तालुक्यातील रेगडी पासून सुमारे 2 किमी अंतरावर दुपारी 12 वाजताच्या सुमारास दुचाकीचा अपघात झाला. यांत दुचाकी चालक
पांडुरंग वाढई राहणार जामगिरी
हे आपल्या दुचाकीने (क्रमांक mh33 N 5318) चंदनवेली ते आपल्या गावी जामगिरी येथे जात असताना आपल्या दुचाकीचा नियंत्रण सूटल्याने ते रस्त्या कडेला कोसळले. त्यामुळे ते जखमी अवस्थेत पडून होते. त्यांच्या डोक्याला जब्बर मार बसला आहे.
घटनेची माहिती मिळताच समाजसेवक प्रशांतभाऊ शाहा यांनी घटना स्थळी जाऊन जखमीस आपल्या स्वतःच्या चारचाकी वाहनाने प्राथमिक आरोग्य केंद्र रेगडी येथे उपचाराकरिता दाखल केले. पुढे जामगिरी येथील घरच्यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांना चंद्रपूर करीता रेफेर दिल्याने गाडीची व्यवस्था करून दिली त्या बद्दल त्यांचे नातेवाहिकांनी प्रशांतभाऊ शाहा यांचे व त्यांचे मित्र आकाश कुळमेथे,तेजराव मंनो,प्रकाश शाहा,सुजन रॉय,अंकुश चंदनखेडे,बालाजी नेवारे आदींचा आभार मानले आहेत.