Homeचंद्रपूरआज घुग्घुस नगरपरिषद व्हावी या मागणीसाठी घुग्गुस कडकडीत बंद...

आज घुग्घुस नगरपरिषद व्हावी या मागणीसाठी घुग्गुस कडकडीत बंद…

आज सकाळी घुग्घुस नगरपरिषदेच्या मागणी साठी घुग्गुस बंद ठेवण्यात आले. सकाळ पासूनच सर्व पक्षीय नगरपरिषद स्थापना समितीच्या नेत्यांनी दुचाकीने घुग्गुस परिसरात फिरून दुकाने बंद ठेवण्याचे आव्हान केले. या आवाहनास घुग्गुस वासियांनी उत्तम प्रतिसाद दिला त्यामुळे १०० टक्के बंद यशस्वी झाला. गांधी चौकात सर्वपक्षीय नगर परिषद स्थापना समितीच्या नेत्यांनी घुग्गुस नगरपरिषद झालीच पाहिजे अश्या घोषणा दिल्या व घुग्घुस नगर परिषदेच्या मागणी करीता पुढे अधिक तिव्र आंदोलन करण्यात येनार अशी माहिती दिली. ग्रामपंचायत कार्यालयात सर्वपक्षीय नगरपरिषद समितीच्या नेत्यांची सभा पारपडली.
काल बुधवारला घुग्गुस ग्रामपंचायत कार्यालयात  सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रीत येऊन घुग्घुस ग्रामपंचायतिच्या होणाऱ्या निवडुकांवर बहिष्कार टाकला आणी घुग्घुस ग्रामपंचायत निवडुक कोणीही लढणार नाही यावर एकमत होऊन घुग्घुस नगर परिषदेची मागणी केली.
नुकताच घुग्गुस ग्रामपंचयतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. दिनांक २३ डिसेंबर पासून उमदवारी अर्ज स्विकारण्यात होते.
त्याअनुषंगाने नगरपरिषद बनविण्यासाठी हालचालींना वेग आला.
घुग्घुस ग्रामपंचायत निवडुकांवर सामुहीक रित्या बहिष्कार टाकला. आणी घुग्घुस नगर परिषदेच्या मागणी करीता समिती स्थापन केली. त्या समितीत प्रत्येक पक्षाच्या व संघटनेच्या अध्यक्षासह दोन सदस्य घेण्यात आले.
घुग्घुस नगरपरिषदेच्या मागणी करीता उद्या दिनांक २४ डिसेंबर ला घुग्घुस बंद ची हाक देण्यात आली. यावेळी घुग्घुस ग्रामपंचायत कार्यालयात ज्यांनी कागदपत्रांसाठी अर्ज करुन दाखले बनविले त्यांनी ते अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात परत करावे असे आव्हन केले यातील काहींनी आपले दाखले ग्रामपंचायत कार्यालयात आपले दाखले परत केले.
घुग्गुस ग्रामपंचायत कार्यालयातील
सभेत घुग्घुस येथील भाजपा,कांग्रेस,शिवसेना,राष्ट्रवादी, बिएसपी, बिआरएसपी,आरपिआय व यंग चांदा ब्रिगेडचे नेते सभेत सहभागी झाले होते.
यावेळी सर्व पक्षीय नगरपरिषद स्थापना समिती, घुग्गुस ची स्थापना करण्यात आली. सर्व पक्षीय नगर परिषद स्थापना समिती, घुग्गुस च्या वतीने मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना निवेदन घुग्गुस  ग्रमसाचिव यांच्या मार्फत देऊन घुग्गुस ग्रामपंचायत निवडणूक रद्द करून तात्काळ घुग्गुस नगरपरिषदेची स्थापना करून निवडणुका घेण्यात याव्या असे निवेदन देण्यात आले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!