सरकारी रास्त भाव दुकानातील माल काळ्या बाजारात विक्रीला नेत असताना दोघे जण ताब्यात…

944

नागेश इटेकर
गोंडपिपरी तालुका प्रतिनधी

गोंडपिपरी तालुक्यातील घडोली येथील स्वस्त धान्य दुकानदार शंकर कन्नाके, दुकान प्रधिकारपत्र क्रमांक NAG-2010 मधील रेशन माल काळ्या बाजारात नेत असताना घडोली येथील स्थानिक गावकऱ्यांनी पकडला. याबाबत गोंडपिपरी पोलीस ठाण्यात माहीत दिली असता स्वस्त धान्य दुकानदार व वाहन चालकास अटक करण्यात आली आहे.
घडोली येथील सरकारी रास्त धान्य दुकानदार शंकर कन्नाके हा शासकीय अन्नधान्याचा माल राजरोसपणे काळ्या बाजारात विक्रीला नेत असायचा. गावातील लाभार्थी अन्नधान्याची उचल करण्यास दुकानात गेले असता, त्यांना जादा दराने वितरीत करायचा. एक महिना रेशन वितरित करायचा असा शासन आदेश असून देखील दोन ते तीन दिवसच वितरीत करत असे. चौथ्या दिवशी अन्नधान्य घ्यायला कोणी लाभार्थी दुकानात गेला असता त्यांना कोटा संपला तुम्ही ठरवलेल्या दिवशी आले नाही त्याला मी काय करू? असे नाना तर्‍हेचे उत्तर देऊन वेळ प्रसंगी अरे -तुरेची भाषा सुद्धा वापरत असायचा असे स्थानिक गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
त्याच्या या प्रकरणामुळे गावातील नागरिक हताश झाले होते, शेवटी आमच्या गावातील नागरिकांचा कोटा अखेर जातो तरी कुठे? असा प्रश्न घडोली येथील गावकऱ्यांना पडला. या संपूर्ण गोष्टीचा छडा लावण्यासाठी घडोली ग्रामस्थांनी शंकर कन्नाके या दुकानदारावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आणि तो दिवस उजाडला.
आज दिनांक १९ डिसेंम्बर २०२० ला घडोली येथील हनुमान मंदिर परिसरात तून एम एच -34 डी- 5789 या क्रमांकाच्या ऑटो त मोठ्या चुंगळयांमध्ये काहीतरी कोंबून नेत असल्याचे गावकऱ्यांना संशयास्पद दिसून आले. त्यामुळे ऑटोला रोखून वाहकाला विचारणा केली असता वाहक उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यात खरंच काय वस्तू आहे याची शहानिशा गावकऱ्यांनी केली असता, पांढऱ्या रंगाच्या सात चुंगड्यामध्ये शासकीय वितरण करण्यात येत असलेला तांदूळ त्यात भरून दिसला. लगेच अन्नपुरवठा निरीक्षक संघपाल मेश्राम यांना घटनेची माहिती दिली असता मेश्राम हे गावाबाहेर असल्याचे सांगितले. आणि त्यांनीच गोंडपिपरी पोलीस स्टेशनला माहिती पुरविली. माहिती मिळताच ठाणेदार धोबे आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनेच्या स्थळी येऊन पोहोचले. ऑटो मधील माल ताब्यात घेऊन वाहन चालक व दुकान मालकास अटक करून ताब्यात घेतले समोरील कारवाई ठाणेदार धोबे करीत आहे.