Home Breaking News अभियंता युवतीची गळफास घेऊन आत्महत्या…

अभियंता युवतीची गळफास घेऊन आत्महत्या…

1804

शेखर बोंनगीरवार

भद्रावती: दिनांक 19. डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता कटारिया लेआउट मध्ये एका अभियंता तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

सोनाली सुरेश उईके. ((32)) असे मृतक युवतीचे नाव आहे. ती पुणे येथे वीप्रो कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होती. घटनेच्या दिवशी ती पुणे येथून सकाळी दहा वाजता भद्रावती ला आली होती.दरम्यान दुपारी चार वाजताच्या दरम्यान तिने घरीच छताच्या पंख्याला विद्युत इस्त्री केबलने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. सोनालीचे वडील सेवानिवृत्त वेकोली कर्मचारी आहेत.

Don`t copy text!