लोणी बिट अंतर्गत सुमारे पाचशे ग्रामसुरक्षा रक्षकांद्वारे सतरा गावांची गस्त; पो. उ. नि. संतोष नेमनार यांचा अभिनव उपक्रम

318

अजय चोथमल
प्रतीनीधी मेडशी

रिसोड: मागील अनेक महिण्यापासुन कोरोणा लाॅकडाऊन मुळे अनेकांचा रोजगार हिरावल्याने मागील काही दिवसामध्ये चोरट्यांनी धुमाकुळ घातला होता.यावर वेळीच निर्बंध घालण्यासाठी पोलिस निरीक्षक एस.एम.जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष नेमणार यांनी तात्काळ चोरट्यांचा धुमाकुळ थांबविण्यासाठी लोणी बिट अंतर्गत सतरा गावामध्ये सुमारे प्रत्येक गावामध्ये 30 ग्रामसुरक्षा रक्षकांना प्रोत्साहीत करीत गावाच्या सुरक्षे साठी तैनात करून ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतला आहे.
रिसोड तालुक्यातील मागील काही दिवसामध्ये मोठेगांव, मोप, मांडवा येथे चोरट्यांनी हात साफ केल्याने अनेक गावातील ग्रामस्थांमध्ये चोरट्यांमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते.तालुक्यातील गावे शंभर आणि रिसोड पोलिस स्टेशनला कर्मचारी अवघे शंभरच्या आसपास तेव्हा ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

यावर खुप विचार मंथन झाल्या नंतर ठाणेदार जाधव यांच्या नेतृत्वाखाली पिएस.आय.संतोष नेमणार यांनी आपल्या चमुसह कंकरवाडी, आगरवाडी, चिचांबाभर, जवळा, मांडवा, मोहजाबंदी, आसोला, कु-हा, लोणी खु.लोणी, बु.मोप, बोरखेडी, शेलुखडशे, मांगवाडी, चा-कोली, भर जहागिर आशा सुमारे सतरा गावामधील पोलिस पाटील,तंटामुक्त समित्यासह ग्रामपंचायत सरपंच,सदस्य,तसेच गावतील प्रतिष्ठित नागरिकांच्या गावोगावी सभा घेत सुमारे पाचशे युवकांना ग्रामसुरक्षा रक्षणाचे महत्व पटवुन देत रात्रपाळीच्या गस्त वाढवुन युवकामध्ये ग्राम रक्षणा प्रती सकारात्मक भाव निर्माण केल्याने आज रिसोड तालुक्यातील लोणी बिट अंतर्गत सुमारे सतरा गावामध्ये सुमारे 510 ग्रामसुरक्षा रक्षक रिसोड पोलिस स्टेशन च्या ओळख पत्रासह रात्रीची गस्त करीत आसल्याने अनेक गावातील ग्रामस्थ चोरट्याच्या धुमाकुळा पासुन सुरक्षित राहात आहेत.