HomeBreaking NewsBVG कंपनी च्या विरोधात युवासेनेचे मनपा आयुक्तांना निवेदन

BVG कंपनी च्या विरोधात युवासेनेचे मनपा आयुक्तांना निवेदन

 

नागपुर :- नागपुर शहरातील युवासेना पदाधिकारी यांच्या तर्फे नागपुर महानगर पालिका आयुक्त मा.राधाकृष्णन यांना नागपुर शहरातील कचरा उचलणारी कंपनी BVG च्या विरोधात निवेदन देण्यात आले. सदर निवेदन युवासेना जिल्हा युवा अधिकारी हितेश यादव यांच्या मार्गदर्शनात व युवासेना शहर सचिव गौरव गुप्ता याच्या नेतृत्वात देण्यात आले.

युवासेनेने दिलेल्या निवेदनात आयुक्तांना सांगितले की, नागपुर शहरातील भांडेवाडी डम्पिंग यार्ड च्या रस्त्यावर मोठे गाड्या जात असतांना त्यावर कचरा भरलेल्या गाड़ीवर ताडपतरी न झाकुन गाड्या नेत असतात आणि त्यामुळे प्रदूषण होते आणि तोच कचरा रस्त्यावर पडलेला असतो त्या मुळे कचरा संकलन करणाऱ्या B.V.G.कंपनी ला दंड व योग्य कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी युवासेना पदाधिकारींनी केली.

तसेच रस्त्याची दुर्दशा अतिशय खराब झालेली आहे ते ही लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली. आयुक्तांनी मागणी पुर्ण करण्याचे आश्वासन दिले या वेळी प्रामुख्याने युवासेना शहर प्रमुख अक्षय मेश्राम, युवासेना उपजिलाधिकारी आकाश पांडे व निखिल शर्मा उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!