दिव्यांग बंधू-भगिनींनी आपल्या शारीरिक दुर्बलतेवर सुस्काऱ्या टाकत न बसता आपल्या अधिकारासाठी लढा, सामाजिक कार्यकर्त्या मा.संगीता तुमडे यांचे जागतिक दृष्टीदिन कार्यक्रमात प्रतिपादन

374

 

गडचिरोली प्रतिनिधी/ सतिश कुसराम

*कुरखेडा* (दि.१९ आक्टो)
दि.१५ आक्टोबर २०२० जागतिक दृष्टीदिनाचे औचीत्य साधून दिनांक १९/१०/२०२० रोजी ग्रामपंचायत पुराडा येथील सभागृहामध्ये जागतिक दृष्टीदिन कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिव्यांग बांधवाना मार्गदर्शन करताना विकलांग या व्यक्तीचे अधिकार या विषयाच्या अभ्यासक तथा विषयसमन्वयक मा.संगीता तुमडे यांचे दिव्यागांणा प्रतिपादन करताना विकलांग व्यक्तींनी आपल्या शारीरिक दुर्बलतेवर सुस्कार्या टाकुन गोंजारत रडण्यापेक्षा त्यावर मात करून आपल्या अधिकारासाठी तथा अस्मितेसाठी लढावे,माणूस आपल्या व्यंगत्वामुळे कधीच दुर्बल नसतो तर विचाराने अधीक मानसिकव्यंगीत असतो, ज्यांचे आचार- विचार समृद्ध् आणि सकारात्मक असतात त्यांच्या प्रवासातील अडथळे आपोपच कमी होत जातात असे वक्तव्य मा.संगीता तुमडे तालुका अपंग संघटना कुरखेडा, यांच्या वतीने आयोजित जागतिक दृष्टिदिन ह्या कार्यक्रमात केले.सोबतच शासनाचे सर्व नियम पाळून कोरोना महामारी विषयी जनजागृती करत सनिटायजर,मास्क वापरा संदर्भात आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या योजनेविषयी प्रबोधन ही करन्यात आले.तसेच ह्या दिवसाला जागतिक पांढरीकाठी असेही का संबोधन्यात येते ह्यावर प्रकाश टाकुन लुईस ब्रेल यांच्या कार्यावर कटाक्ष टाकण्यात आले,लुईस ब्रेल अंध असून पुढे येणाऱ्या अंध व्यक्तीसाठी ब्रेल लीपी तयार केली, सुरुवातीला ही लीपी १६ टींबाची होती, लीहिण्या – वाचन्याची अडचणी लक्षात घेवून त्याची संख्या मर्यादा आटोक्यात आणून शेवटी ६ टींबाची ब्रेल लीपी तयार केली, या लीपीवर आज जगातले सर्व दिव्यांग बंधू-भगीनी सर्वसामान्य माणसा प्रमाणे उच्च शिक्षणासठी पात्र होऊन शिक्षणाची ज्ञांनगंगा प्राशन करुन आपले शैक्षणिक तथा व्यवसायीक क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करून आपल्या व्यक्तित्वाचा विस्तार करुन घेत आहेत, त्यांची एक आठवण म्हणून पांढरी काठी हे साधन दीव्यांग बंधूभगीनीसाठी परीचालणात येणाऱ्या अडथळयावर मात करण्यासाठी वापरले जाणारे माध्यम आहे, या सगळयांना उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम जागतिक स्तरावर साजरा केला जातो, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने वीकलांग व्क्तींनी स्वतःची क्षमता ओळखून ती वाढवून स्वावलंबी व्हावं. दीव्यांग व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असलेल्या दरबारी अनेक योजना आहेत. फक्त फायदा घेणाऱ्याची कमतरता आहे, तेव्हा सर्व दीव्यांग बंधू-भगीनीनि शासन दरबारी असलेल्या योजनाचा फायदा घेऊन आपली ओळख स्वत:तयार करावी, आज आपले अनेक बंधू भगिनी आपल्या क्षमतेचा पूर्ण सकारात्मक वापर करून प्रशासनातील सर्वोच्च पद IAS, IFS, IRS सारख्या प्रतिष्ठित पदावर कार्यरत असून देशसेवेसाठी प्रेरणेचा स्त्रोत निर्माण करून आपल्या अस्मितेला नवी चमक प्राप्त करून दिली आहे. आजचं प्रेरणादायी दिवस म्हनून अनेक दिव्यांग बंधूभगीनीसाठी हा मोठ्या उत्साहाने ज़ागतिक जस्तरावर पाळला जातो, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अनेक योजनाची माहिती ही देण्यात आली,सोबतच शासकीय योजना मिळवण्यासाठी शासन निर्णय सर्वात मोठ्ठे शस्त्र आहे,या कार्यक्रमाच्या अनुषंगाने १९९४ च्या अवयव प्रत्यारोपण कायद्याची माहिती देण्यात आली, नेत्रदानाचे, देहदानाचे महत्व विशद करण्यात आले, विकलांग व्यंक्तीनी शासनाला झुकवायचे असेल तर संघटना मजबूत करायला हवी, स्वत:चा व्यवसाय उभारून अर्थाजन करून कुटुंबाला आधार बनावे असेही त्यात मार्गदर्शन करण्यात आले, दृष्टी दिनाच्या औचित्य साधून डोळयातील एकंदरीत रचनेवीषयी माहिती देण्यात आली, अंधत्व येण्याची कारणे, परिणाम आणि त्यावरचे उपाय यांवर विस्तृत विवेचन तथा मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन जीतेंद्र पाटणकर, प्रस्तावना महेश नीकुरे,
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री, दत्तात्रय डोंगरवार पोलीस पाटील पुराडा तथा ग्रामसेवक
तंटामुक्ती अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. संगीता तुमडे आणि समस्त गावकरी दिव्यांग बंधू भगिनी उपस्थित होते.आभार ज्योत्सना राऊत यांनी केले.