भारतीय राष्ट्रीय मानव अधिकार पार्टीचा जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन

508

 

चंद्रपूर प्रतिनिधी/ कैलास दुयाँधन

भारतीय राष्ट्रीय मानव अधिकार पार्टीचा जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन दिनांक 14 दहा 2020 रोजी येथील दूध डेरी, पत्रकार भवनासमोर पाटीँ चे राष्ट्रीय महासचिव मा. सिद्धार्थ साखरे यांच्या हस्ते पार पडले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभप्रभातावावर ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन होते.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या शोषित वर्गांसाठी लढा उभारला व त्यांना न्याय हक्क समानता मिळवून दिली त्याप्रमाणे जिल्ह्यातील गरीब गरजू लोकांना या कार्यालयाच्या मार्फत न्याय मिळवून देण्याचा मानस यावेळी श्री .साखरे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला
यावेळी बोलताना विदर्भ संपर्क प्रमुख शेखर तावडे यांनी समाजातील तळागाळातील वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षीत वर्गातला आपल्या पक्षात येण्याचे आवाहन केले .
राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री .कुणाल कांबळे राष्ट्रीय प्रभारी श्री. तपण कुमार चे महामंत्री श्री .मिलिंद भाऊ दुधे,काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सचिव श्री. सय्यद रमजान अली आर.पी.आय (आंबेडकर) च्या महिला विदर्भ अध्यक्ष सौ .प्रिया खाडे जिल्हाध्यक्ष श्री .डी .एस माधव यांनी मानवी हक्काबद्दल विरुद्ध निवृत्त माहिती दिली यावेळी भा.रा .मा .पा विदर्भ अध्यक्ष श्री. सुशील कुमार शिंदे महिला जिल्हाध्यक्षा सौ. सारिका ताई रायपुरे चंद्रपूर जिल्हा सचिव श्री. अशोक पवार सौ. कविता महाजन सौ.दभिता कातकर श्रिमती सुनीता वैद्य, माणिकचंद्र गाऊत्रे, वसंत रहाटे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते संचालक श्री .शेखर तावडे तर आभारप्रदर्शन श्रि .माधव यांनी केले.