Home गडचिरोली केंद्राच्या शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसचे 15 ऑक्टोबरला आंदोलन

केंद्राच्या शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसचे 15 ऑक्टोबरला आंदोलन

416

 

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी – नितेश खडसे

केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्यामुळे शेतकरी उध्वस्त होणार असल्याने येत्या १५ ऑक्टोंबरला केंद्राच्या शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेस आंदोलन करणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज १३ ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रकार परीषदेत दिली.
पत्रकार परीषदेत माहिती देतांना ना.वडेट्टीवार म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व तालुक्यात व प्रमुख २० शहरात व्हर्चुअल रॅली आयोजित करण्यात येईल. एलसीडी स्क्रीनच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या कृषी कायद्याचे दुष्परीणाम यावर कृषीतज्ञाकडून मार्गदर्शन करण्यात येईल. या नवीन शेतकरी कायद्यामुळे शेतकरी उध्वस्त होईल. शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार नाही. जनसंघाच्या भारतीय किसानसंघाने या कायद्याला विरोध केला आहे असेही ना. वडेट्टीवार म्हणाले. पत्रकार परीषदेला जिल्हा परीषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा परीषद सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम उपस्थित होते…

Don`t copy text!