इकडे रास्तारोको ; तिकडे वाघोबाचे रानडुकरावर ताव

375

 

राजूरा ( चंद्रपूर )

बारा मानवी बळी घेणाऱ्या वाघाला ठार करा , ही मागणी घेऊन आज राजूरा येथे रास्तारोका करण्यात आले.दूसरीकडे राजूरा तालुक्याती कवितपेठ नियत वन क्षेत्राचे शेतशिवारात असलेल्या दोन रानडुकरांना ठार केले.शेतात वाघाचे पगमार्क आढळून आल्याने शेतकरी दहशतीत आहेत.

राजूरा तालुक्यात वाघाची दहशत शिगेला पोहचली आहे.वाघाचा हल्यात आतापर्यंत दहा शेतकरी ,शेतमजूरांना जिव गमवावा लागला आहे.या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची मोठी फौज कार्यरत आहे मात्र प्रत्येकवेळी वाघोबा हूलकावणी देत आहे. अद्यापही वाघ मोकाट असल्याने संतप्त झालेल्या शेतकरी ,शेतमजूरांनी आज राजूरा शहरात आंदोलन केले. वाघाला ठार मारा ,यासाठी आंदोलन सूरू असतांनाच तालुक्यातील कविटपेट नियत वन क्षेत्रातील परिसरातील शेतात वाघाने दोन रानडुकरांना ठार केल्याची घटना उजेडात आली. घटनेची माहीती मिळताच वनकर्मचार्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.रानडुकरांना ठार करणारा वाघ नरभक्षक वाघच आहे काय ? या बाबत अधिक माहीती घेण्यासाठी विरूर वनक्षेत्रातील वन अधिकार्यांशी सपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.दरम्यान शेतशिवारात वाघ आढळून आल्याने धानोरा परिसरात दहशत पसरली आहे.