रेती चोरांचा मोर्चा आता हीवरा घाटाकडे

666

 

धाबा /अरूण बोरकर

गोंडपिपरी तालुक्यातील रेतीघाटावर चोर अक्षरस तूटून पडले आहेत.तारसा घाटावर राजरोषपणे रेती चोरी सूरू असतांना आता चोरांनी तालुक्यातील हीवरा घाटाकडे आपला मोर्चा वढविला आहे.रेतीची चोरी करित असतांना महसूल विभागातील अधिकारी येत असल्याची माहीती चोरांना मिळाली.यानंतर चोरांनी घाटावरून पळ काढला. चोर तालुक्यातील की तालुक्या बाहेरचे ? याची चर्चा गावात रंगली आहे.

गोंडपिपरी तालुक्यात रेती चोरी वाढली आहे.महसूल विभागातील काही अधिकारी आणि माध्यमातील काही प्रतिनिधींना सोबत घेऊन तारसा घाटावर रेतीची चोरी केली जात होती.हा प्रकार ” इंडीया दस्तक न्यूज टिव्ही ” ने पुढे आनला.रेती चोरीत काही राजकारण्यांचा समावेश असल्याची चर्चाही रंगली.रेती चोरीवरून एका राष्ट्रीय पक्षाचा गोंडपिपरी शाखेत दोन गटांनी एकमेकावर शाब्दीक चिखलफेकही केली.हा प्रकार ताजा असतानाच काही चोरांनी हीवरा घाटाकडे आपला मोर्चा वढविला आहे. गावात सूरू असलेल्या चर्चेनूसार आज पहाटेला हीवरा घाटावर दोन हायवा,एक ट्रक्टर आणि जेसिबीचा साह्याने रेती चोरी सूरू होती.याची माहीती कुणीतरी महसूल विभागाला दिली.महसूल विभागाचे कर्मचारी हीवरा घाटाकडे निघाले मात्र त्यापुर्विच चोरांनी तिथून पळ काढला. कोरोनाचे संकट उद्दभवले अन देश टाळेबंद झाला.या संकटात शासकीय कर्मचाऱ्यांंवर अतिरिक्त भार पडत आहे.कर्मचाऱ्यांचे फोकस कोरोना संकटावर आहे.याचाच फायदा चोर उचलित आहेत.