गोंडपिपरी तालुक्यात प्रतिष्ठित चोरांचा बोलबाला

960

चंद्रपूर / मुन्ना तावाडे ( मुख्य संपादक )

गोंडपिपरी तालुका तसा मागासलेला तालुका. येथिल तरूणांचा हातांना काम नाही.सिंचन सूविधा तोकड्या असल्याने शेती बेभरोश्याची.मजूरांची वाताहत येथे नेहमीच असते.लघू व्यवसायातून पोट भरणार्यासाठी टाळेबंदी मारक ठरली.सामान्य जनता अतिशय बिकट स्थितीतून जात असतांना चोरांचा मात्र येथे बोलबाला आहे.हे चोर साधे नाहि.प्रतिष्ठित चोर आहे. राजकाकीय पदांचा वापर चोरीसाठी करणाऱ्या या चोरांची भलतीच चर्चा तालुक्यात सूरू आहे.

गोंडपिपरी मागासलेला तालुका असला तरी येथे खनिज संपदा मोठी आहे.येथे नदी,नाल्यातील वाळू उच्च दर्जाची आहे.त्यामुळे येथिल वाळूला मोठी मागणी आहे. सध्या रेतीघाटाचे परवाने नाहीत.त्यामुळे तालुक्यातील रेतीघाटावर चोरांचा मात्र बोलबाला सूरू आहे.गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या तारसा येथिल घाटावर खुलेआम रेतीची चोरी सूरू आहे. येथिल रेतीचोरीचा बातम्या माध्यमात झळकल्या होत्या.तसे वाळू तस्करी हा काही तालुक्याला नवा विषय नाही. तो जूनाच आहे. रेती चोरी करणाऱ्यात राजकिय व्यक्ती अग्रेसर आहेत हे ही नवे नाही.मात्र तारसा आणि लगतचा परिसरातून होणाऱ्या रेती चोरीत भाजपाचा एका नेत्याची चर्चा तालुक्यात सूरू आहे. गोंडपिपरी भाजपातील एका जेष्ठ पदाधिकार्याची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी भाजपाच्याच एका पदाधिकार्याकडून चोरी होत असल्याचे चर्चा ऐकल्याचे कबूल केले. तो कुणीही असला तरी याचे समर्थन करणारा नाही.पुरावे हाती येताच कार्यवाही करू असे त्यांनी इंडीया दस्तक न्यूज टिव्हीला सांगितले. एकंदरीत पदाचा दुरपयोग करीत टाळेबंदीत या प्रतिष्ठित चोरांचे चांगभले सूरू आहे. प्रशासनातील काही अधिकारी आणि माध्यमातील काहींना हाताशी धरून चोरधंदे तालुक्यात खुलेआम सूरू आहेत.

जनता उपाशी ; चोर तुपाशी

टाळेबंदीत सामान्य जनतेचे मोठे हाल सूरू आहेत. हाताला काम नाही त्यात लघूव्यवसाय ठप्प असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. अश्या कठिण समयी शासनाचा विविध योजनांचा मार्फत अथवा शासनावर दबावतंत्र वापरून सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेत्यांनी पुढाकार घेणे गरजेचे होते मात्र टाळेबंदीत नेते चोरीत गुंतले आहेत. या प्रकाराने सामान्य जनता संतापली असून प्रतिष्ठित चोर नेत्यांची चर्चा गावागावात सूरू आहे.