कृषी संशोधकाकडून वढोलीत किड रोगाची पहाणी

1066

कृषी विभागाचा पुढाकार;अधिकार्यांकडून मार्गदर्शन व जनजागृती

गोंडपिपरी/आकाश चौधरी

कोरोनाच्या महामारीन सर्वत्र चिंतेच वातावरण आहे.अशात शेतपिकाःवर आलेल्या किडरोगान बाळीराजा चिंतेच्या सावटात आहे.अशा शेतकऱ्यांना दिलासा व मार्गदर्शनातून जनजागृती करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांच्या पुढाकारातून वढोली गावात कृषी सःशोधन केंद्राच्या सःशोधकांनी शेतपिकाची पहाणी केली.किडरोगावर मात करण्यासाठी कशी उपाययोजना करायची याबाबत बाःद्यावरच मार्गदर्शनातून जनजागृती करण्यात आली.
सध्याच्या वातावरणात खूप बदल होत आहे.याचा परिणाम धान,कापूस,सोयाबीन पिकावर होत आहे.या पिकावर किड रोगाचे आक्रमण होत आहे.या नवीनच सःकटाने बळीराजा संकटाच्या सावटात आहे.
अशा गंभीर स्थीतीत या संकटावर मात करण्यासाठी व शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी कृषी विभाग सरसावला.गोंडापिपरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीन नुकतेच वढोली,तारडा,नांदगाव,घडोली या गावातील शेतकऱ्यांच्या बाःद्यावर जाऊन किडरोग प्रतिबःधक उपाययोजना राबाविण्याबाबत उपक्रम राबविण्यात आला.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उद्दय पाटील,केव्हिके सिंदेवाही चे प्रमुख शास्त्रज्ञ विनोद नागदेवते,तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांच्यासह विभागाची संपुर्ण चमू उपस्थीत होती.
यावेळी पुरबाधीत क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सोप्टोरिया अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्याच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या.
भातपिकावर तपकिरी तुडतुडे चा प्रादुर्भाव होत असल्याने मेटारायझियम अनिसोपल्ली हे जैविक किटकनाशक अडीच किलो हे.वाफर करावा.इमिडिकोप्रिड 48 sl किंवा प्रिप्रोनिड 5 एससी 20 मिली याप्रमाणे फवारणी करावी.
कापूस पिकाच्या पुरबाधीत क्षेत्रामध्ये आलेल्या रोगाला नियःत्रण ठेवण्यासाठी प्रोफोनाकास 50 प्रवाही 20 मिली किंवा क्विनालाफ्राक्स 25 टक्के 25 मिली दहा लिटर पाण्यातून फवारावे
गोंडपिपरी तालूक्यातील अनेक गावात कृषी विभागाच्या वतीन किडरोग नियंत्रणासाठी जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात आले.किडरोगाच्या फवारणीसंदर्भात काही शंका असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांनी केले आहे.