गोंडपिपरीच्या साई मशिनरीला आग/लाखो रूपयाचे साहित्य जळून खाक

0
496

 

गोंडपिपरी / आकाश चौधरी

Advertisements

गोंडपिपरी येथील व्यापारी अजय माडूरवार यांच्या साई मशिनरी दूकानाला आज पहाटे आग लागली.या आगीत लाखो रूपयचा मालाचे नुकसान झाले.आग लागल्यानंतर तातडीन अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले.यामुळ मोठा अनर्थ टळला.
आज पहाटे गोंडपिपरी येथील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.पुरवठा पुन्हा सूरळीत झाल्यनंतर साई मशिनरी या दुकानात स्पार्कींग झाल्याने आग लागली.अजय माडूरवार यांच्या दूकानावर निवासस्थान आहे.आगीची माहिती मिळताच आग विझविण्यासाठी प्रयत्न झाले.राजूरा येथून अग्नीशामक दलाचे वाहन बोलविण्यात आले.
वाहन वेळेवर पोहचल्याने मोठा अनर्थ टळला.या आगीत साधारणत लाखो रूपयाचे सामान जळल्याची माहिती अजय माडूरवार यांनी दिली.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here