Home Breaking News मुधोली चेक नं.२ येथील जमीन अधिग्रहणास शेतकऱ्यांचा विरोध; प्रशासनाने गावात येऊन चर्चा...

मुधोली चेक नं.२ येथील जमीन अधिग्रहणास शेतकऱ्यांचा विरोध; प्रशासनाने गावात येऊन चर्चा करावी…

129

मुधोली चेक नं.२ येथील जमीन अधिग्रहणास शेतकऱ्यांचा विरोध; प्रशासनाने गावात येऊन चर्चा करावी

प्रतिनिधी गौरव बुरांडे
चामोर्शी : मौजा मुधोली चेक नं.२ येथे प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेला स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी मा. तहसीलदार, चामोर्शी व मा. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, दिनांक १० ते १४ दरम्यान पोलिस बंदोबस्तात ड्रोनच्या साहाय्याने जमीन मोजणी सुरू असून ही प्रक्रिया शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तसेच ‘वरद फेरो अलॉयज’ कंपनीकडून मुधोली चेक नं.२ परिसरात स्पंज आयर्न प्लांट, इंडक्शन फर्नेस रोलिंग मिल, फोर्जिंग, पिलिंग, ब्राईट बार, इन्गोट कास्टिंग, कॅप्टिव पॉवर प्लांट व सबमर्ज्ड आर्क फर्नेस उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यासाठी सुमारे ७८.९९ हेक्टर जमीन अधिसूचित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
मात्र या संदर्भात स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांशी कोणतीही सविस्तर चर्चा किंवा संमती घेण्यात आलेली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने कार्यालयात मर्यादित लोकांमध्ये चर्चा करण्याऐवजी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी थेट मुधोली चेक नं.२ येथे येऊन सर्व शेतकरी व ग्रामस्थांसोबत खुली चर्चा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच पोलिस बंदोबस्तात सुरू असलेली ड्रोनद्वारे जमीन मोजणी तात्काळ थांबवावी, अन्यथा ग्रामस्थांकडून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन देताना: भारत कडते,सोनू कुमरे अ‍ॅड. राकेश तोरे,. देवराव आत्राम. रोशन कुमरे.सुनील बकाले गुरूदास ठुसे सुनील तोरे., सुधाकर आलाम अरुण आलाम. जमणादास देव्हारे. किशोर सुरकर. रेविदास सुरकर. वसंत बुरमवर प्रवीण हजारें , . गजानन कुळमेथे. नरेश मेश्राम. दादाजी सुरकर.आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Don`t copy text!