Home Breaking News आनंदनिकेतन महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा संपन्न…

आनंदनिकेतन महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा संपन्न…

126

आनंदनिकेतन महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा संपन्न

प्रतिनिधी संकेत कायरकर वरोरा

गेली अनेक वर्षे आनंद निकेतन महाविद्यालयात संपन्न होणारी स्वर्गीय इंदिरा बाई जनार्दनपंत देशपांडे स्मृती आंतर महाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धा या वर्षी शुक्रवार 06 मार्च 2026 ला महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.’अल्पवयीन (अठरा वर्षाखाली) मुलामुलीं साठी समाज माध्यमावर बंदी घातली पाहिजे का? होय/नाही’.या विषयावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मृणाल काळे हे होते तर परीक्षक म्हणून डॉ. डी. बी.खामनकर, प्रणिशास्त्र विभाग प्रमुख, लोकमान्य महाविद्यालय वणी, प्रा. अनिल डहाके, राज्यशास्त्र विभाग, भवाणजीभाई कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, हेमंत मालेकर पीएचडी स्कॉलर लोकमान्य टिळक महाविद्यालय वनी उपस्थित होते .
या स्पर्धेचे समालोचन करतांना प्रा. अनिल डहाके यांनी विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि वादविवाद स्पर्धेत उतरताना स्पर्धकांनी कशी तयारी केली पाहिजे.वेळेचे नियोजन कसे असावे यावर मार्गदर्शन केले.डॉ. डीबी खामनकर यांनी याप्रसंगी स्पर्धकांनी मुद्देसूद मांडणी,विषयाचा सखोल अभ्यास व वाचन केल पाहिजे असे मत मांडताना भाषेवरही प्रभुत्व असले पाहिजे असे मत व्यक्त केले. श्री हेमंत मालेकर यांनीही याप्रसंगी या स्पर्धेला परीक्षक म्हणून येता आले याचा आनंद व्यक्त केला.विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे मांडलेल्या मतांचे कौतुक ही केले आणि परीक्षकांच्या वतीने आभार मानले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ.मृणाल काळे यांनी या स्पर्धेतील सर्वच स्पर्धकांचे कौतुक केले.स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेताना अधिकाधिक संख्येने अशा स्पर्धांमध्ये भाग घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले.
या स्पर्धेत श्री.हर्षल सालवे ( एस पी लॉ कॉलेज चंद्रपूर )कु.सिद्धी अलोनी
(कर्मवीर महाविद्यालय,मूल)व मयूर हनवते ( आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा ) यांना अनुक्रमे प्रथम,व्दितीय व तृतीय पारितोषिक मिळाले. उत्तेजनार्थ पारितोषिक कु. समीक्षा आसुटकर (आनंदनिकेतन कृषी महाविद्यालय,वरोरा)हिला मिळाले. तर फिरता चषक एस. पी. लॉ कॉलेज चंद्रपूर यांना मिळाला.
या स्पर्धेचे प्रास्ताविक, स्पर्धेचे संयोजक असणारे डॉ.अरविंद बरडे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. तिलक ढोबळे व स्पर्धेच्या नियमांचे वाचन प्रा.मोक्षदा नाईक यांनी केले.
प्राचार्य डॉ.मृणाल काळे यांच्या मार्गदर्शनात व डॉ.रामदास कामडी डॉ.नरेंद्र पाटील, डॉ.संयोगीता वर्मा,डॉ. आशिष वाकुलकर, डॉ.अविनाश नन्नावरे, यांच्या सहकार्यात ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली.

Don`t copy text!