Home Breaking News महाशिवरात्रीत राज्य परिवहन महामंडळास ‘शंभो देव’ पावला…

महाशिवरात्रीत राज्य परिवहन महामंडळास ‘शंभो देव’ पावला…

83

महाशिवरात्री यात्रेतून रापम महामंडळास ‘शंभो देव’ पावला

जिल्हा संपादक नितेश खडसे गडचिरोली

१४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत सवलतीसह ३० लाख ५४ हजारांचे उत्पन्न
गडचिरोली (Mahashivratri Yatra) : यावर्षी १५ फेब्रुवारीपासुन सुरू झालेल्या महाशिरात्री यात्रेस जाणार्‍या भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नयेत म्हणुन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागाने केलेल्या अचुक नियोजनामुळे १४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत सोडण्यात आलेल्या १५३६ बसफेर्‍यामुळे रापमच्या गडचिरोली विभागास ‘शंभो देव’ पावून तब्बल ३० लाख ५४ हजार ३१३ रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

गडचिरोली
Mahashivratri Yatra : महाशिवरात्री यात्रेतून रापम महामंडळास ‘शंभो देव’ पावला

१४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत सवलतीसह ३० लाख ५४ हजारांचे उत्पन्न
गडचिरोली (Mahashivratri Yatra) : यावर्षी १५ फेब्रुवारीपासुन सुरू झालेल्या महाशिरात्री यात्रेस जाणार्‍या भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नयेत म्हणुन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागाने केलेल्या अचुक नियोजनामुळे १४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत सोडण्यात आलेल्या १५३६ बसफेर्‍यामुळे रापमच्या गडचिरोली विभागास ‘शंभो देव’ पावून तब्बल ३० लाख ५४ हजार ३१३ रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

महामंडळातर्फे देण्यात येणार्‍या सवलतीचाही झाला फायदा
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर जिल्ह्यात १५ फेब्रुवारीपासून आयोजित महाशिवरात्री यात्रेत मार्कंड देव व अन्य ठिकाणी जाणार्‍या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणुन राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागाच्यावतीने नियोजन करण्यात आले होते. विभागीय नियंत्रक अशोक वाडीभस्मे यांच्या नेतृत्वात ७० यात्रा स्पेशल बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते.

महाशिवरात्री यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ गडचिरोली विभागाने विशेष नियोजन करून अतिरिक्त बसफेर्‍या सुरू केल्या होत्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध भागांतून हजारो भाविक यात्रेसाठी येत असल्याने प्रवासाची गैरसोय होऊ नये, यासाठी गडचिरोली, ब्रम्हपुरी आणि अहेरी आगारांतून विशेष यात्रा बसेस सोडण्यात आल्या.

मार्कंडादेव, अरततोंडी, चपराळा, व्यंकटापूर येथे मोठ्या यात्रा भरतात. त्यामुळे या ठिकाणी एस.टी. महामंडळाकडून यात्रा स्पेशल बसेस सोडण्यात आल्या.यात्रेच्या कालावधीत एकूण १ हजार ५३६ विशेष फेर्‍या पूर्ण करण्यात आल्या. या सर्व बसांनी मिळून तब्बल ४४ हजार २६४ किलोमीटर अंतर पार केले. या विशेष वाहतुकीतून एसटी महामंडळाला एकूण विना सवलतीचे २० लाख १५ हजार ९३१ रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे यात्रेच्या काळात प्रवाशांची सोय तर झालीच, शिवाय महामंडळाच्या महसुलातही भर पडली.

गडचिरोली आगारातून सर्वाधिक ८५३ फेर्‍या चालवण्यात आल्या. या फेर्‍यांदरम्यान बसेसनी २२ हजार ४३३ किलोमीटर अंतर कापले. गडचिरोली आगारास १० लाख ७२ हजार ६४२ रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे गडचिरोली आगार महसूल आणि फेर्‍यांच्या संख्येत अव्वल ठरले. यात्रेकरूंची सर्वाधिक गर्दी गडचिरोली शहरातून असल्याचेही या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.

ब्रम्हपुरी आगारातून ५५३ फेर्‍या सोडण्यात आल्या. या बसेसनी १७ हजार ४४१ किलोमीटर अंतर पूर्ण केले. त्यातून ८ लाख २० हजार १०८ रुपयांचे उत्पन्न मिळाले. नियोजनबद्ध पद्धतीने अतिरिक्त बस उपलब्ध करून दिल्यामुळे ब्रम्हपुरी परिसरातील भाविकांना मोठा दिलासा मिळाला.

अहेरी आगारातून १३० विशेष फेर्‍या चालवण्यात आल्या. या फेर्‍यांनी ४ हजार ३९० किलोमीटर अंतर पार केले. त्यातून १ लाख २३ हजार १८१ रुपयांचे उत्पन्न मिळाले. तुलनेने कमी फेर्‍या असूनही अहेरी आगारातूनही यात्रेसाठी समाधानकारक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर यात्रेकरूंची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने विशेष नियोजन केले होते. आवश्यक तेथे अतिरिक्त बस, चालक व वाहकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वेळेवर सेवा देण्यासाठी नियंत्रण कक्ष सक्रिय ठेवण्यात आला होता.

यात्रेच्या काळात कोणतीही मोठी अडचण न येता सर्व फेर्‍या यशस्वीपणे पूर्ण झाल्या. एसटी महामंडळाच्या या विशेष उपक्रमामुळे भाविकांना सुरक्षित, सोयीस्कर आणि परवडणारा प्रवास मिळाला. तसेच गडचिरोली विभागाच्या महसुलातही लक्षणीय वाढ झाल्याने प्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

Don`t copy text!