Home Breaking News परमपूज्य महात्मा गांधी कॉन्व्हेन्ट शाळा, रेगडी येथे वार्षिक समारोह उत्साहात संपन्न…

परमपूज्य महात्मा गांधी कॉन्व्हेन्ट शाळा, रेगडी येथे वार्षिक समारोह उत्साहात संपन्न…

174

परमपूज्य महात्मा गांधी कॉन्व्हेन्ट शाळा, रेगडी येथे वार्षिक समारोह उत्साहात संपन्न


प्रतिनिधी गौरव बुरांडे:
परमपूज्य महात्मा गांधी कॉन्व्हेन्ट शाळा, रेगडी येथे शनिवारी वार्षिक समारोह कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाचे उद्घाटन बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ शाहा व रेगडीच्या सरपंच सुरेखा गेडाम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भाऊ शाहा, डॉ. उमाकांत मेश्राम तसेच पोलीस स्टेशन रेगडीचे प्रभारी कुणाल इंगळे, जे विलास सर,उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागतगीताने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य, देशभक्तीपर गीत, नाट्य सादरीकरण तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम विशेष आकर्षण ठरले. प्रत्येक सादरीकरणास उपस्थितांकडून उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट मिळाला.
या प्रसंगी मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त, कष्टाची तयारी व सामाजिक जबाबदारीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी मोबाईल व व्यसनांपासून दूर राहून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत मान्यवरांनी शाळेचे मुख्याध्यापक अशोक कांचू सर, अभिजित विश्वास सर, तसेच संपूर्ण शिक्षकवृंद व व्यवस्थापनाचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Don`t copy text!