Home Breaking News शहीद जवान दीपक मडावी यांचा कुटुंबीयांचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे व संदीप...

शहीद जवान दीपक मडावी यांचा कुटुंबीयांचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे व संदीप भाऊ कोरेत यांनी केले सांत्वन…

86

शहीद जवान दिपक चिन्ना मडावी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
शहीद जवान दीपक मडावी यांचा कुटुंबीयांचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे व संदीप भाऊ कोरेत यांनी केले सांत्वन

प्रतिनिधी आदित्य चिप्पावार एटापल्ली 

महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवर माओवाद्यांशी झालेल्या भीषण चकमकीत C-60 अहेरी (प्राणहिता) येथे कार्यरत असलेले जवान दिपक चिन्ना मडावी देशासाठी हसत-हसत हौतात्म्य पत्करले. गडचिरोली जिल्ह्यातील मांडरा गावचा हा शूर सुपुत्र आज संपूर्ण जिल्ह्याच्या डोळ्यांत अश्रू आणून गेला आहे.

शनिवारी आमदार डॉ. मिलिंद नरोठे व शिवसेना,अहेरी विधानसभा क्षेत्रा चे नेते संदीपभाऊ कोरेत यांनी शहीद जवानांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. शहीद जवानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी शहीद जवानांची पत्नी, त्यांचा लहान मुलगा व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्यांनी आपल्या वीर पती व वडिलांना अखेरचा निरोप दिला. आमदार नरोटे व संदीप भाऊ कोरेत यांनी कुटुंबीयांची आस्थेने चौकशी करत, “ही लढाई केवळ तुमची नाही, ही संपूर्ण समाजाची आहे. तुमच्या दुःखात आम्ही तुमच्यासोबत आहोत,” असे शब्द दिलासादायक ठरले.

संदीपभाऊ कोरेत म्हणाले,
“देशाच्या रक्षणासाठी कुटुंबापासून दूर राहून प्राण अर्पण करणाऱ्या या वीर जवानाचे बलिदान अमर आहे. त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आता आपली आहे. शहीद कुटुंबीयांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल.”

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अक्षय करपे, युवासेना उपजिल्हा प्रमुख साई चंदनखेडे, रविभाऊ भांडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आईचा आधार, पत्नीचा संसार आणि मुलाचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्राणांची आहुती देणारा हा जवान केवळ एका कुटुंबाचा नव्हता, तर संपूर्ण समाजाचा अभिमान होता. कुटुंबापासून दूर राहून देशासाठी लढणाऱ्या प्रत्येक जवानाचे ऋण समाज कधीही फेडू शकणार नाही.

वीर शहीद दिपक चिन्ना मडावी यांचे बलिदान इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल.

Don`t copy text!