Home Breaking News चारगांव (बु )येथे रमाई जयंती संपन्न…

चारगांव (बु )येथे रमाई जयंती संपन्न…

111

चारगांव (बु )येथे रमाई जयंती संपन्न

प्रतिनिधी संकेत कायरकर वरोरा 

चारगांव बु. येथील पंचशील बुद्ध विहारामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती ने त्यागमूर्ती रमाई जयंती आयोजित करण्यात आली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून चारगांव बु. चे पोलीस पाटील श्री. राजेंद्र थुल तथा या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून वायगाव भो. चे पोलीस पाटील श्री. शंकर भोयर आणि मार्गदर्शक म्हणून प्रा. विजय गाठले उपस्थित होते. तसेच जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. प्रतीक थुल, सचिव वंश पाटील, सदस्य रुपेश गाठले, सागर गाठले तथा गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. गाठले यांनी माता रमाई यांच्या जीवनातील समर्पण आणि त्यागाने भरलेले अनेक क्षण सांगितले. रमाई पुजण्यापेक्षा प्रत्येक माता भगिनींनी रमाई वयक्तिक व सार्वजनिक जीवनात जगावी, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे संचालक सौ.अरुणाबाई भगत यांनी तर आभार प्रफुल पाटील यांनी केले.

Don`t copy text!