Home Breaking News हळदवाही (रेगडी) जिल्हा परिषद क्षेत्रात विकासाचा नवा टप्पा!

हळदवाही (रेगडी) जिल्हा परिषद क्षेत्रात विकासाचा नवा टप्पा!

271

हळदवाही (रेगडी) जिल्हा परिषद क्षेत्रात विकासाचा नवा टप्पा!

भाजप बंगाली जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांच्या हस्ते मौजा रेगडी येथील नवीन अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण

प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट

रेगडी: चामोर्शी तालुक्यातील हळदवाही (रेगडी) जिल्हा परिषद क्षेत्रातील मौजा रेगडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या *अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण भारतीय जनता पार्टीचे बंगाली जिल्हाध्यक्ष मा. सुरेश शहा यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले*. ग्रामीण भागातील बालकांसाठी शिक्षण, पोषण व सुरक्षिततेच्या दृष्टीने ही इमारत मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

*लोकार्पण प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुरेश शहा म्हणाले की, ग्रामीण विकास म्हणजे केवळ रस्ते व इमारती नव्हे, तर पुढील पिढी घडवणाऱ्या बालकांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे होय. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून अंगणवाडी, शाळा, आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी भाजप कटिबद्ध असून गावागावात विकास पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.*

नवीन अंगणवाडी इमारतीमुळे रेगडी परिसरातील लहान बालकांना सुरक्षित, स्वच्छ, सुसज्ज व अनुकूल वातावरणात शिक्षण, पोषण आहार व आरोग्य सुविधा मिळणार असून माता-भगिनींनीही समाधान व्यक्त केले. ही इमारत गावाच्या सर्वांगीण विकासात मोलाची भर घालणारी ठरणार आहे.

या लोकार्पण सोहळ्याला सरपंच सुरेखा गेडाम, माजी सरपंच बाजीराव गावडे, ग्रामपंचायत सदस्य तोंदेश भाऊ तलांडे, माजी सरपंच सुधाकर पोटावी, रेणू पोटावी, लालसू पावे, बाजीराव तलांडे, उमेश मल्लिक, देवराव खंडरे, ग्रामसेवक गुगलत साहेब यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले. विकासाभिमुख नेतृत्वामुळे रेगडी परिसरात आणखी मूलभूत सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Don`t copy text!