Home Breaking News धान मळणीच्या थ्रेशर मशीन मध्ये तोल गेल्याने एका शेतकरी कुटुंबातील वनरक्षकाचा मृत्यू…

धान मळणीच्या थ्रेशर मशीन मध्ये तोल गेल्याने एका शेतकरी कुटुंबातील वनरक्षकाचा मृत्यू…

276

धान मळणीच्या थ्रेशर मशीन मध्ये तोल गेल्याने एका शेतकरी कुटुंबातील वनरक्षकाचा मृत्यू.

मुख्य संपादक प्रशांत शाहा 

गडचिरोली : थ्रेशर मशिनमध्ये तोल जाऊन एका
३० वर्षीय वनरक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना आज, बुधवार २१ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील मुरमाडी गावातील शेत शिवारात घडली. सचिन देवराम हलामी वय ३० वर्षे, रा. ईरुपटोला, ता. धानोरा, जि. गडचिरोली असे मृत पावलेल्या वनरक्षकाचे नाव असून त्यास काही कलावधीपूर्वी अवैध लाकूड तस्करी प्रकरणी निलंबित करण्यात आले होते.
सध्या स्थितीत गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात धान मळणीची कामे सुरू आहेत. विशेष करून, धानोरा तालुका परिसरातील काही शेतकरी जो पर्यंत धान विक्रीसाठी महामंडळात नंबर लागत नाही, तोपर्यंत धानाची मळणी करीत नसल्याची माहिती आहे. त्यानुसार, आज बुधवारी मुरमाडी येथील शेतकरी विकास शेंडे यांच्या शेतात धान मळणी सुरू होती. मळणी सुरू असतांना सचिन हलामी हा थ्रेशर मशिन जवळ असल्याने त्याचा अचानकपणे मशीनमध्ये तोल
गेला. यात शरीराचा बराचसा भाग मशीनमध्ये अडकून पडल्याने श्वास कोंबला गेला आणि काही क्षणातच सचिनचा मृत्यू झाला. मृतक सचिनच्या पश्चात पत्नी व मुलगी असून घटनेने कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. प्रकरणी कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा उपपोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला.

Don`t copy text!