एटापल्ली येथे भाजपाच्या नव्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन
तालुका प्रतिनिधी आदित्य चिप्पावार
एटापल्ली :
एटापल्ली येथे भारतीय जनता पक्षाच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उद्घाटनामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होऊन जनसेवेचे कार्य अधिक वेगाने आणि प्रभावीपणे राबवले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
नव्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेऊन त्यांचे निराकरण करण्यास गती मिळणार असून, पक्ष आणि जनतेतील संवाद अधिक सशक्त होणार आहे.
या कार्यक्रमास युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, नगरपंचायतच्या भाजपाच्या नगराध्यक्षा सौ. रेखाताई मोहूर्ले, भाजप तालुका अध्यक्ष प्रसाद पुल्लूरवार, तोडसा ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रशांत आत्राम, तसेच मोहन नामेवार, राकेश हिरा, तिरुपती चापले, आविष्कार गड्डमवार, सुरेखाताई अडगोपुलवार, निर्मलाताई कोडबतुनवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन समारंभात उपस्थित मान्यवरांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहण्याचा निर्धार व्यक्त केला.







