Home Breaking News आनंद निकेतन महाविद्यालयात एमबीए करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन -विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या संधींची...

आनंद निकेतन महाविद्यालयात एमबीए करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन -विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या संधींची माहिती

211

आनंद निकेतन महाविद्यालयात एमबीए करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन
-विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या संधींची माहिती

प्रतिनिधी संकेत कायरकर वरोरा

महारोगी सेवा समिती आनंदवन द्वारा संचालित आनंद निकेतन महाविद्यालयातील वाणिज्य विभागाने दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता बीकॉम फायनल वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी एमबीए करिअर मार्गदर्शन विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले होते. हे व्याख्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले.
डॉ. नियाज शेख यांनी एम.बी.ए. (MBA) संबंधित सीईटी (CET) परीक्षाबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर आणि अत्यंत उपयुक्त माहिती प्रदान केली. त्यांनी सांगितले की, एमबीए पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी कोणत्याही कंपनी, फर्म, संस्था किंवा ऑर्गनायझेशनमध्ये उच्च पदस्थ पदांवर नोकरी मिळवू शकतात. या कोर्सचे फायदे स्पष्ट करताना त्यांनी सध्याच्या बाजारपेठेतील संधींवर प्रकाश टाकला.
विशेष म्हणजे, एमबीए केल्यानंतर विद्यार्थी बँकिंग क्षेत्रात असिस्टंट मॅनेजर म्हणून नियुक्त होऊ शकतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या उज्ज्वल संधींचा आशेचा किरण मिळाला. तसेच, ते उद्योजक (Entrepreneur) बनू शकतात, असेही डॉ. शेख यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
व्याख्यानात एम.बि.ए.(MBA)-सीईटी(CET) परीक्षेचे सिलॅबस, प्रवेश प्रक्रिया, फी संरचना आणि उपलब्ध स्कॉलरशिप याबाबतही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. बीकॉम पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षण आणि रोजगाराच्या विविध संधींबाबत विद्यार्थ्यांना स्पष्टता मिळाली.
हे व्याख्यान विशेषतः बीकॉम फायनल वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते, जेणेकरून त्यांना पदवी पूर्ण झाल्यानंतरच्या करिअरच्या दिशेने योग्य मार्गदर्शन मिळेल. वाणिज्य विभागाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास वाढला असून, अशा प्रकारच्या मार्गदर्शन सत्रांचे आयोजन भविष्यातही सुरू ठेवण्याचे आश्वासन विभागाने दिले आहे.
या कार्यक्रमाला वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. संदिप ताजने, प्रा. निखिल चिडे, प्रा. टोंगे सर, प्रा. टिपले सर, प्रा. कीर्तने मॅडम उपस्थित होते.

Don`t copy text!