Home Breaking News विलासपल्ली येथील नामकीर्तन सोहळ्यास भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारासगडे यांची उपस्थिती…

विलासपल्ली येथील नामकीर्तन सोहळ्यास भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारासगडे यांची उपस्थिती…

153

विलासपल्ली येथील नामकीर्तन सोहळ्यास भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारासगडे यांची उपस्थिती

प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
चामोर्शी तालुक्यातील विलासपल्ली येथे भागवत सप्ताहानंतर तीन दिवसीय भव्य नामकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमास विकासपल्ली येथील ग्रामस्थांनी भाजपचे जिल्हा अध्यक्ष रमेश बारासगडे तसेच भाजप बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ शाहा यांना विशेष आमंत्रण दिले होते. आमंत्रणास मान देत त्यांनी या नामकीर्तन सोहळ्यास उपस्थिती दर्शवली.
या प्रसंगी रेगडी–हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात भाजपचे जिल्हा महामंत्री साईनाथ बुरांडे, शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हा सचिव प्रशांत शाहा, चापलवाडा ग्रामपंचायतचे सरपंच गितेश कोहपरे यांच्यासह बाजीराव गावडे, बाजीराव तलांडे, तारक हलदार,दिवाकर भट्टलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
नामकीर्तनाच्या माध्यमातून भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. या धार्मिक कार्यक्रमामुळे गावात सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडले. उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे व ग्रामस्थांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले.

मान्यवरांचे स्वागत करताना

Don`t copy text!