Home Breaking News बोअरवेल (विंधन विहीर) या घटकाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरु…

बोअरवेल (विंधन विहीर) या घटकाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरु…

118

तालुका प्रतिनिधी आदित्य चिप्पावार एटापल्ली:

कृषि विभाग जिल्हा परिषद गडचिरोली मार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात, मा. राज्यमंत्री (कृषि) तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री मा. ना. आशिष जयस्वाल यांचे संकल्पनेतून एटापल्ली, अहेरी, मुलचेरा व भामरागड या तालुक्यातील सुरजागड लोहप्रकल्पाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बाधित क्षेत्रातील शेतक-यांना जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत विंधन विहीर योजना मंजूर झाली असून १५० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे, त्यापैकी ९१ लाभार्थ्यांना मा. जिल्हाधिकारी श्री अविश्यांत पंडा यांचे हस्ते कार्यारंभ आदेश देण्यात आले असून, पहिला विधन विहिरीचा काम दिनांक १ जानेवारी २०२६ ला एटापल्ली तालुक्यात शेतकरी श्री पेका वारला कोरामी मौजा पेठा यांचे शेतात सुरु झाला आहे. या घटकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना/लाभार्थ्यांना सिंचनासाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता वाढविण्याचा शासनाचा उद्देश आहे. सदर कामाच्या शुभारंभावेळी श्री राजेंद्र भुयार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गडचिरोली, श्रीमती किरण खोमणे कृषि विकास अधिकारी, तोडसा ग्रामपंचायत सरपंच श्रीमती वनिता कोरामी, श्री प्रशांत आत्राम उपसरपंच, श्री नितीन पाटील उपअभियांता यांत्रिकी विभाग, श्री खोकले शाखा अभियंता, श्री आनंद पाल जिल्हा कृषि अधिकारी (विघयो), श्री पेंदाम सहाय्यक गट विकास अधिकारी, श्री तुषार पवार कृषि अधिकारी प.स. एटापल्ली, श्री रमेश बोरकुटे ग्रामविकास अधिकारी तसेच श्री रैजू गावडे सामाजिक कार्यकर्ते तसेच इतर ग्रामस्थ व शेतकरी बहुसंखेने उपस्थित होते.

पुढील ३ महिन्यात उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार असून सदर विंधन विहिरीचा काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना कुसुम योजनेअंतर्गत अर्ज करण्यास सांगून सोलर पंप सुविधा उपलब्ध झाल्यावर जिल्ह्यातील रबी तसेच बागायती पिके वाढण्यास मदत होणार आहे, तसेच कायमस्वरूपी सिंचनाची सोय शासनामार्फत उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना दिसून येत आहे.

Don`t copy text!