रेगडीत 28 रोजी ‘अवतार’ या तीन अंकी नाटकाचे व नटखट सुंदरा लावणी होणार सादर…

298

रेगडीत 28 रोजी ‘अवतार’ या तीन अंकी नाटकाचे व नटखट सुंदरा लावणी होणार सादर
रेगडी (ता. चामोर्शी) : येथील नवयुवक नाट्य कला मंडळ, रेगडी यांच्या वतीने रविवार, दिनांक 28 रोजी रात्री ठीक 8 वाजता ‘अवतार’ या तीन अंकी नाटकाचे व नटखट सुंदरा लावणी डान्स कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. या नाटकाच्या माध्यमातून सामाजिक आशय मांडण्यात येणार असून ग्रामीण भागातील नाट्यसंस्कृतीला चालना मिळणार आहे.
‘अवतार’ या नाटकात स्थानिक कलाकारांचा सहभाग असून प्रभावी अभिनय, संवाद आणि सादरीकरणामुळे नाट्यरसिकांना दर्जेदार अनुभव मिळेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.
या सांस्कृतिक कार्यक्रमाला रेगडी व परिसरातील नागरिक, युवक व नाट्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नवयुवक नाट्य कला मंडळ, रेगडी यांनी केले आहे.