प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट इंडिया दस्तक न्यूज टीव्ही पोर्टल
रेगडी (ता. चामोर्शी) : ग्रामपंचायत रेगडी अंतर्गत रेगडी टोला येथे आदिवासी समाज बांधवांनी एकत्र येत पेसा दिवस अत्यंत उत्साहात व जल्लोषात साजरा केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजाला मिळालेल्या घटनात्मक हक्कांची माहिती देत स्वशासन, ग्रामसभा सशक्तीकरण आणि स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार याबाबत सविस्तर जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमास प्रतिष्ठित नागरिक केशरी पाटील तेलामी सरपंच देवदा,फकरी नरोटे गाव भुमीया, लालसू पावे,सुरेखा गेडाम सरपंच रेगडी, तिम्मा सर रेगडी इलाका अध्यक्ष, मनोहर हलामी इलाका सचिव,संतोष तुमरेटी उपसरपंच देवदा, वडेटीवार मॅडम,पेसा मार्गदशक तोंदेस तलांडे,मुन्शी गावडे,देवाजी वड्डे, शिवसेना जिल्हा सचिव प्रशांत शाहा, यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपस्थित वक्त्यांनी पेसा कायद्याची पार्श्वभूमी, त्यामधून आदिवासी समाजाला मिळालेले अधिकार, ग्रामसभेची भूमिका, तसेच जंगल, जमीन, पाणी व स्थानिक संसाधनांवरील हक्क याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान आदिवासी समाजाची परंपरा, संस्कृती, भाषा व रीतिरिवाज जपण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला. युवक-युवतींनी देखील मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत पेसा कायद्याबाबत जागरूक राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
संपूर्ण कार्यक्रम शांततामय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पेसा दिवसाच्या आयोजनाला यशस्वी केले.







