प्रतिनिधी शरद कुकुडकर

आपल्या नेतृत्वगुण आणि कर्तृत्वाने गोंडपिपरी तालूक्यातील समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून अनेक विकासकामे खेचून आणणारे तसेच किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे,गोरगरीबांचे कैवारी,गरजूंचा मदतीसाठी धावून जाणारे,जनतेचे वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे,शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवणे आणि त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी त्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे,सर्वांना सोबत घेऊन चालणारे,पदासाठी नाही तर आपण जनतेसाठी लढणारे याचे प्रचिती वेळोवेळी देणारे असे खंबीर नेतृत्वगूण असलेले गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधीचे भाजपा नेता मा अमर बोडलावार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य मोफत आरोग्यसेवा व शस्त्रक्रिया उपक्रम राबविण्यात आला.
गोंडपिपरी तालुक्याचे बुलंद आवाज अमर बोडलावार यांचा वाढदिवसानिमित्त त्यांचा मित्रपरिवाराकडून अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवले जात आहे.त्यात गरजू,तळागळातील जनतेसाठी निरनिराळे शिबीर आयोजित करून त्याचा लाभ शेवटचा घटकापर्यत पोहोचविण्याचे काम अविरत सुरू आहे.त्याचाच भाग म्हणून यावर्षीसूद्धा भव्य मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन माता कन्यका परमेश्वरी सभागृह ,गोंडपिपरी येथे आदरणीय सूधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रेरणेतून तसेच मा आमदार देवराव दादा भोंगळे यांच्या सहकार्याने व त्यांच्या मार्गदर्शनाने यशस्वीरित्या पार पाडली.
या शिबिरात विविध आजारांवर तपासणी करून मोफत औषधोपचार केले ,१४७६ रूग्णांनी तपासणी केली आणि शस्त्रक्रियेसाठी ३८५ रूग्ण पात्र ठरले,त्या रूग्णांची शस्त्रक्रिया डॅा. शालीनी मेघे यांचा दत्ता मेघे हॅास्पीटल वाना डोंगरी,नागपूर यांचा सौजन्याने मोफत शस्त्रक्रिया व उपचार केल्या जाणार आहे.
या शिबिराचे लाभ घेणारे निराधार,आर्थिक दुर्बल घटक त्यांचा चेहऱ्यावरील समाधान व आनंद ,त्यांच आशीर्वाद हेच आपण कमावलेलं धन असा विचार वाढदिवसाचा दिवशी त्यांनी व्यक्तकेला . या शिबिराला आमदार देवरावदादा भोंगळे यांनी भेट देऊन अमर बोडलावार यांना शुभेच्छा दिल्या.गोंडपिपरी तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते अथक परिश्रम घेऊन हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडले.
कार्यक्रमाची सुरुवात माता कन्यका देवीची आरती करून समाजबांधवाचा शूभेच्छाने झाली .कार्यक्रमाची सांगता जनतेच्या आशिर्वादानी झाले .
एवढेच नव्हे तर भंगाराम तळोधीतील मित्रपरिवार त्यांचासाठी ढोलताशांचा गजर करत मिरवणूक काढत जि प शाळेत वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला.आजाद हिंद चौक गोंडपिपरी येथे मित्रपरीवाराकडून दूधवाटप करण्यात आला.
या प्रसंगी बाजार समिती सभापती ईंद्रपाल धूडसे ,उपसभापती स्वप्निल अनमूलवार,तालुका अध्यक्ष दिपक सातपूते, अध्यक्ष कोडंय्या महाराज संस्थान धाबा सुहास माडूरवार, मारोती अम्मावार,चेतनसिंग गौर,राकेश पून,बबन निकोडे, वैभव बोनगिरवार,विजय पेरकावार,मारोती,शेंडे,संतोष मूग्गलवार,संजय येलमूले,अरुण कोडापे,अजय पेरकावार,भानेश येग्गेवार,देवराव चौधरी,सूनिल घाबर्डे,हिरा कंदिकूरवार,प्रवीण धोडरे,साईनाथ मास्टे,राकेश साखलवार,शितिल लोणारे,बंडू बोनगिरवार,निखिल चंद्रगिरीवार,हरीश घोगरे,राजू गोहणे,लक्ष्मण येलमूले,सतीश वासमवार, निलेश संगमावर ,संजय झाडे,संदिप पौरकार, समीर निमगडे,चंद्रजीत गव्हारे,रितेश वेगीनवार, अनिकेत बूरांडे,योगेशखामनकर,अजित कोहपर्,प्रवीण बिरेवार, आशिष मामीडपेल्लीवार,संस्कार बोड्लावार,यश उत्तरवार,अतुल बूक्कावार,संदिप बूक्कावार,विजय शेरकूरवार,अरूण कोटगले,अरूणा जांभूळकर,कोमल फरकडे स्,संजना अम्मावार,संगीता अम्मावार,स्वाती वडपल्लीवार ,सूरेखा श्रीकोंडावार,माया वाघाडे,नंदाताईघोगरे, कांचन गरपल्लीवार ,रोशनी अनमूलवार,निलिमा कंदिकूरवार,पपीता कोडापे,अश्विनी तोडासे,मनिषामडावी,रामगिरकार,शारदा गरपल्लीवार,कलावती पूपलवार, सूरेखा पिपरे, भारती साखलवार,पंकज विरूटकर,विठ्ठलचनकापूरे, शेगमवारमहाराज ,प्रकाश रापलवार,आशिष मोरे,विनोद गरपल्लीवार ,सुभाष शेंद्रे,अनिल काबेवार ,प्रकाशचौधरी,कालिदास फलके,सूनिल रामगोनवार,सत्यवान पाल ,रवि पाल,खूशाबराव ढूमने,संदिप ढूमणे,निलेश पूलगमकर,अतुल गोरकार,पंकज आमटे,चंद्रकला भोयर,सूमित पूलगमकर,शरद पोलोजवार,संदिप अवथरे,नम्रता बारसागडे,प्रज्वल बोबाटे,पंकज चिलनकर,मनोज वनकर,बालू दिंगलवार,गणेश मेरूगवार,नितेश तूमडे,गिरीश चरडूके,रतन तिवाडे,उमेश तिवाडे,सागर अल्लूरवार,रवि खेरकर,राहूल चिताडे,धनू वेलादि,परशुराम कूबडे,ओम लेनगूरे,राहूल धूडसे,सूधिर राऊत.संजय गूडमेट्लावार,डॉ रॉय,सतीश दोरीवार,राकेश कटकमवार,संजय वडस्कर,अखिल चंद्रगिरवार,अनिकेत नामेवार,विशाल बावने.








