राजुरा आगारची टेकामांडवा मार्गे भारी-शेडवाही -बाबापूर लालपरी सेवा सुरु करा…

212

सुदाम राठोड यांची मागणी

बळीराम काळे, जिवती

जिवती (ता.प्र.) : मागील दोन वर्षांपासून राजुरा भारी शेडवाही बाबापूर मार्गे बस सेवा बंद आहे. तरी सर्व सामान्य जिवती तालुक्यातील जनतेला प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खास करून जे वयोवृध बुजुर्ग मंडळी यांना जो अर्ध तिकीटाचा फायदा मिळायचा तो त्यांना मिळत नाही.प्राथमिक शालेय विदयार्थ्यांना,कॉलेज,
महाविद्यालय जाण्यासाठी खाजगी वाहनात बसून जाणे,म्हणजे कटकट बनली आहे.तरी सुद्धा आस पासचे नागरीकांना प्रवास करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे .म्हणून आगार प्रमुख यांनी तात्काळ या समस्याचा गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ राजुरा ते भारी शेडवाही बाबापूर बस सेवा तात्काळ सुरु करण्यात यावे.
जेने करून नागरिक व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना वेळेवर कॉलेज, महाविद्यालय,शाळाना वेळेत जाता येईल.
असे निवेदन जिवती तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सुदाम राठोड यांनी तहसीलदार जिवती यांच्या मार्फत राज्य परिवहन मंत्री महाराष्ट्र यांना पाठविले आहे. तात्काळ बससेवा सुरु करण्यात यावी अन्यथा जिवती तालुक्यातील सर्वसामान्य जनतेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा सुदाम राठोड यांनी निवेदनातून दिला आहे.