घोट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मॅरेथॉनमध्ये चमकदार कामगिरी केली…

182

प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
आंतर महाविद्यालयीन वार्षिक क्रीडा महोत्सव 2025 – 2026 गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली मॅरेथॉन स्पर्धा, चंद्रपूर येथे आयोजीत स्पर्धेत
स्व.जोगेश्वर सावकार गण्यारपवार कला व
विज्ञान महाविद्यालय घोट. येथील विद्यार्थ्यांनी विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश मिळवले.
या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. मा. अतुलभाऊ गण्यारपवार, संस्थेचे मार्गदर्शक श्री. अजिंक्य भाऊ गण्यारपवार, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रविण मडावी,प्रशिक्षक महेश वाढई सर.श्री. भोलाराम मेश्राम, तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा कर्मचारी वृंद यांनी त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन पर कौतुक केले.
🎖️ रोशन पितांबर बोदलकार, बी.एस्सी. द्वितीय वर्ष
सुवर्ण पदक – 10,000 मीटर धावणे – वेळ : 34:14 सेकंद
रौप्य पदक – 3000 मीटर ट्रिपल चेस – वेळ : 10:41 सेकंद
रौप्य पदक – 21:97 हाफ मॅरेथॉन – वेळ : 1:08:43 सेकंद
सुवर्ण पदक – 5000 मीटर धावणे – वेळ : 16:13 सेकंद
🎖️ रोहन संजय भुरसे, बी.एस्सी. प्रथम
सुवर्ण पदक – 3000 मीटर तिहेरी धावांचा टप्पा – वेळ : 10:40 सेकंद
रौप्य पदक – 800 मीटर धावणे – वेळ : 2:04 सेकंद
रौप्य पदक – 1500 मीटर धावणे – वेळ : –
🎖️ यश राजु भांडेकर, बी.ए. प्रथम वर्ष
रौप्य पदक – 10,000 मीटर धावणे – वेळ : 34:58 सेकंद
रौप्य पदक – 21:97 अर्ध मॅरेथॉन – वेळ : 1:08:23 सेकंद

🎖️ 4×400 मीटर रिले संघ
रौप्य पदक – 4×400 मीटर रिले धावणे