आमदार देवराव भोंगळे यांची मा. मुख्यमंत्री महोदयांची भेट…

358

प्रतिनिधी सिद्धार्थ दहागावकर 

सन २०२५ मधील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज अंतर्गत दि. ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयात गोंडपिपरी तालुक्याचा समावेश होता परंतू राज्य शासनाकडून दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी काढण्यात आलेल्या सन २०२५ मधील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी बाधित तालुके घोषित करण्याच्या सुधारित शासन निर्णयात गोंडपिपरी तालुक्याला वगळण्यात आल्याने स्थानिक शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती; या संदर्भात काल (दि. १३ आक्टोंबर) रोजी नागपूर येथे आयोजित संघटनात्मक बैठकीवेळी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन गोंडपिपरी तालुक्याचा पुन्हा समावेश करण्याची विनंती केली.

खरंतर गोंडपिपरी तालुका हा प्रामुख्याने शेतीबहुल असून तालुक्याच्या चारही बाजूंनी वैनगंगा, वर्धा व अंधारी या प्रमुख नद्या वाहतात. या भौगोलिक रचनेमुळे, जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रचंड हानी झाली असून, पीक आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीचा विचार करत आपण यात जातीने लक्ष घालून, सुधारित शासन निर्णयात तातडीने दुरुस्ती करावी आणि गोंडपिपरी तालुक्याचा समावेश पुन्हा बाधित तालुक्यांच्या यादीत करावा, जेणेकरून येथील नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना न्याय व दिलासा मिळेल. अशीही मागणी त्यांना निवेदन देत यावेळी केली. यावर मा. मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वस्त केले आहे.