तातडीने रस्ते दुरुस्त करा, अन्यथा…महापालिकेच्या आवारातच ‘गिट्टी फेक’ आंदोलन…

116

सहसंपादक श्याम मशाखेत्री

खड्डेमय रस्त्यांच्या विरोधात खा. प्रतिभाताई आक्रमक 

चंद्रपूर शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. अपघातांच्या घटना आणि प्रशासनाची बेफिकिरी, हेच आता शहराचे वास्तव बनले आहे. सामान्य जनतेच्या जीवाशी खेळणं पालिकेने त्वरित थांबवावं.

पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जाब विचारत खा. प्रतिभाताईंनी पालिका आयुक्तांना इशारा दिला आहे की, ५ दिवसांत रस्त्यांची दुरुस्ती केली नाही तर महापालिकेच्या आवारातच ‘गिट्टी फेक’ आंदोलन करण्यात येईल.