अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद – गडचिरोली जिल्हा विशेष बैठक संपन्न…

68

प्रतिनिधी सतीश कुसराम

गडचिरोली : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद गडचिरोली जिल्ह्याची विशेष बैठक यशस्वीरीत्या संपन्न झाली. या बैठकीला प्रदेश अध्यक्ष मा. रामसाहेब चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष विवेक नागभीरे, प्रदेश महासचिव केशव तिराणिक, राष्ट्रीय उपाध्यक्ष घनश्याम मडावी, राष्ट्रीय सदस्य जनार्धन पंधरे, महिला प्रदेश कार्याध्यक्ष वर्षा आत्राम, जिल्हाध्यक्ष अमरावती अशोक चव्हाण, युवा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर अतुल कोडापे, विदर्भ सचिव विठ्ठल कोडापे तसेच स्वागतध्यक्ष जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

या बैठकीत १२ही तालुकाध्यक्षांची निवड करण्यात आली. जिल्हा स्तरावर जिल्हामहासचिव उमेश उईके, जिल्हा सचिव सुरज मडावी, जिल्हा उपाध्यक्ष देवराव आलाम, वामन जुनघरे, कोषाध्यक्ष शेमनशाह आत्राम जिल्हा संघटक देवेंद्र राणे, तसेच महिला जिल्हाध्यक्षा पुष्पलता कुमरे, महिला जिल्हा सचिव विद्या दुग्गा, गडचिरोली शहर अध्यक्ष महिला आरती कोल्हे, तालुका अध्यक्ष महिला लिना कोकोडे, चामोर्शी महिला अध्यक्ष सुषमा गेडाम, अहेरी महिला तालुका अध्यक्ष शशिकला तोरेम आदींची निवड झाली.

बैठकीत प्रमुखत्वाने खालील विषयांवर सविस्तर चर्चा झाली :

गैर-आदिवासींची घुसखोरी व जमिनीवरील अतिक्रमण

पेसा (PESA) क्षेत्रातील नियुक्त कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय

आदिवासींचे घटनात्मक अधिकार आणि त्यांचे रक्षण

६ जुलै २०१७ च्या शासन निर्णयाचा आदिवासी समाजावर होणारा परिणाम

स्थानिक समस्या व मागण्यांची बिंदूनिहाय नोंद (बिंदू-नमावली)

बैठकीतील मार्गदर्शन :

डॉ. देवराव होळी साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संघटनेतूनच विविध उपक्रम राबवून रोजगारनिर्मिती कशी करता येईल यावर भर दिला.

प्रदेश अध्यक्ष मा. रामसाहेब चव्हाण यांनी संघटनेचे कार्य समाजाप्रती कसे आहे व संघटनेचे पुढील लक्ष काय आहे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय सदस्य जनार्धन पंधरे यांनी विकास परिषदेची जडणघडण, तिची पार्श्वभूमी आणि आजवरचा प्रवास यावर माहिती दिली.

या चर्चेतून आलेल्या सूचनांनुसार जिल्हा व तालुका पातळीवर कार्य अधिक जोमाने व संघटितपणे करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या बैठकीचे संचालक नवनियुक्त जिल्हा महासचिव उमेश उईके तर आभार महिला जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे यांनी केले. बैठकीला वडसा तालुका अध्यक्ष भूषण अलामे, अहेरी तालुका अध्यक्ष गुरूदास मडावी, कुरखेडा तालुका अध्यक्ष मोहन पुराम, आरमोरी तालुका अध्यक्ष विलास सिडाम, गडचिरोली तालुका उपाध्यक्ष तुषार मडावी, अहेरी शहर अध्यक्ष उमेश पोरतेत,युवा सेना जिल्हा प्रमुख पवन गेडाम, तनुजा कुमरे, रोहिणी मसराम, माधुरी पडोती, पूजा गेडाम, अलींना मडावी, अर्चना टेकाम, बबिता उसेंडी, आरती कंगाले, वनिता ताराम, मालता पुडो, प्रशांत टेकाम, राजीवशाह मसराम, हरिराम कोकोडे, नाजूक होळी, लहानूजी पुराम, नितीन मसराम, प्रफुल कोडाप, श्याम सलामे, ज्ञानेश्वर कोडाप, हर्षद पेंदाम, अनिकेत गेडाम, तेजाराम रायसिडाम, उमेश पोरतेत, तुषार मडावी, आनंद कंगाले, उपस्थित होते