सहसंपादक श्याम मशाखेत्री
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी_फडणवीस साहेब यांच्या हस्ते जिल्हा खनिज प्रतिष्ठानतर्फे तयार करण्यात आलेल्या कॉफी_टेबल_बुकचे अनावरण संपन्न झाले. या प्रसंगी पालकमंत्री मा. प्रा. डॉ. श्री. अशोकही_उईके साहेब , आमदार श्री. सुधीरजी_मुनगंटीवार, आमदार श्री. देवराव_भोंगळे, आमदार श्री. करण_देवतळे सह आपण देखील या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होतो. मा. मुख्यमंत्री महोदय यांनी आपल्या भाषणात सांगितले की, खनिज विकास निधीतून आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा व पर्यावरणपूरक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
ते पुढे म्हणाले की, चंद्रपूर व गडचिरोली हे जिल्हे इंडस्ट्रियल मॅग्नेट म्हणून वेगाने विकसित होत असून, सुमारे १.५ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. औद्योगिकीकरणाबरोबरच पर्यावरण संतुलन राखले जाईल आणि १००% स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच महाराष्ट्रातील ‘ग्रीन कव्हर’ वाढवण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत.