लॉयड्स मेटल कंपनीकडून राजमुद्रा फाऊंडेशनला अत्याधुनिक रुग्णवाहिका भेट…

108

तालुका प्रतिनिधी आदित्य चिप्पावार

एटापल्लीच्या आरोग्य सेवेला नवा आधार

​एटापल्ली: गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली आणि आसपासच्या दुर्गम भागातील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची व महत्त्वपूर्ण घटना नुकतीच घडली आहे.लॉयड्स मेटल अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनी सुरजागड यांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत येथील राजमुद्रा फाउंडेशन एटापल्ली या संस्थेला एक अत्याधुनिक रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) भेट म्हणून प्रदान केली आहे.या महत्वपूर्ण योगदानामुळे एटापल्ली परिसरातील आरोग्य सेवेला एक मोठा आणि निर्णायक आधार मिळाला आहे.

​राजमुद्रा फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिसराची गरज लक्षात घेऊन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरण यांच्याकडे रुग्णवाहिकेची मागणी केली होती.या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कंपनीच्या वतीने भोलुभाऊ सोमनानी यांच्या हस्ते ही अत्याधुनिक सेवा राजमुद्रा फाऊंडेशनला सुपूर्द करण्यात आली.

भव्य समारंभात ‘जीवनवाहिनी’चे लोकार्पण

​दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी श्री सार्वजनिक नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ जिल्हा परिषद हायस्कूलच्या भव्य पटांगणामध्ये या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील नागरिक,राजमुद्रा फाउंडेशनचे पदाधिकारी आणि लॉयड्स मेटल कंपनीचे प्रतिनिधी या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​लॉयड्स मेटल कंपनीच्या विशेष सहकार्यासाठी ओळखले जाणारे भोलुभाऊ सोमनानी यांच्या शुभहस्ते राजमुद्रा फाउंडेशनच्या प्रतिनिधींना या अत्याधुनिक रुग्णवाहिकेची चावी आणि कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाची आणि कृतज्ञतेची भावना स्पष्टपणे दिसत होती.

आरोग्य सेवेला मिळणार मोठा आधार – गरजू रुग्णांसाठी ‘वरदान’

​एटापल्लीसारख्या आदिवासीबहुल आणि दुर्गम भागात वेळेवर आरोग्य सेवा मिळणे हे अनेकदा जीवन-मरणाचे कारण ठरते. विशेषतःअपघातासारख्या किंवा गंभीर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने मोठ्या रुग्णालयात पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिकेची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची असते.
​लॉयड्स मेटल कंपनीने भेट दिलेल्या या रुग्णवाहिकेमुळे आता राजमुद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून एटापल्ली आणि आसपासच्या गावातील गरजू रुग्णांना जलद,सुरक्षित आणि मोफत आरोग्य वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे.यामुळे अनेक रुग्णांचे विशेषत गंभीर परिस्थितीत असलेल्या लोकांचे जीव वाचवण्यास मोलाची मदत होणार आहे.ही सेवा परिसरातील नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरणार आहे.

सामाजिक बांधिलकीचा नवा आणि स्तुत्य आदर्श

​लॉयड्स मेटल अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या सुरजागड प्रकल्पाने सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श घालून दिला आहे.हा केवळ एक रुग्णवाहिका भेट देण्याचा उपक्रम नाही तर परिसरातील हजारो नागरिकांच्या सुरक्षित भविष्यासाठी आणि आरोग्य सुधारणेसाठी उचललेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे.
​राजमुद्रा फाउंडेशनने कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरण आणि भोलूभाऊ सोमनानी यांचे मनापासून आभार मानले आहेत.ही रुग्णवाहिका परिसरातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची ग्वाही फाउंडेशनने यावेळी दिली.

भोलूभाऊ सोमनानी यांनी दाखवलेला हा सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श निश्चितच इतर संस्था आणि उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरेल.
​एटापल्लीच्या विकासात आणि येथील नागरिकांच्या आरोग्याच्या सुधारणेत लॉयड्स मेटल कंपनीचे हे सहकार्य एक मैलाचा दगड ठरणार आहे.यापुढेही असेच समाजोपयोगी उपक्रम कंपनीच्या माध्यमातून सुरू राहतील अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.