सहसंपादक श्याम मशाखेत्री
दि. 27 सप्टेंबरपासून बुधवार, दि. 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालणाऱ्या श्री माता महाकाली महोत्सवाचा शुभारंभ पालखी सोहळ्याने झाला. मातेची चांदीची मूर्ती पालखी मिरवणुकीसह महाकाली मंदिरातून निघाली. ढोल-ताशांचा गजर, जयघोष आणि फुलांच्या वर्षावात ही मिरवणूक पार पडली. मोठ्या संख्येने माता भक्तांनी या सोहळ्यात उत्साहाने सहभाग नोंदवला.
ही मूर्ती मिरवणूक काढून श्री माता महाकाली महोत्सवाचे विश्वस्त श्री. राजु शास्त्रकार यांच्या निवासस्थानी नेण्यात आली. पालखीचे स्वागत विविध ठिकाणी आरती, पुष्पवृष्टी व पारंपरिक वाद्यांच्या गजरात करण्यात आले. या पाच दिवसीय महोत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली आहे. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.