गोंदिया येथे ओबीसी जनआक्रोश महाआंदोलन…

151

सहसंपादक श्याम मशाखेत्री 

गोंदिया – ओबीसी जनआक्रोश महाआंदोलन
गोंदिया येथे दि. 21 सप्टेंबर 2025 रोजी सकल ओबीसी समाजाच्या वतीने आयोजित भव्य जनआक्रोश महाआंदोलनात *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान साहेब* यांनी सहभागी होऊन समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठी घेतलेल्या या आंदोलनात त्यांनी ओबीसी समाजाच्या मागण्यांना तसेच हैद्राबाद गॅझेट नुसार मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये करण्यास काढलेला शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीस पाठिंबा दर्शविला आणि समाजातील उपस्थित नागरिकांना एकत्र येऊन आपला आवाज बुलंद करण्यासाठी प्रोत्साहित केले.
यावेळी उपस्थित ओबीसी संघर्ष समितीचे बबलू कटरे, अमर वऱ्हाडे , मनोज मेंढे, खेमेंद्र कटरे, आमदार विजय भाऊ वडेट्टीवार, खासदार भंडारा गोंदिया लोकसभा खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार परिणय फुके, आमदार राजकुमार बडोले, ,माजी आमदार गोपाल अग्रवाल,माजी खासदार खुशाल जी बोपचे, माजी आमदार दिलीप बनसोड, जि. प. सदस्य उषाताई मेंढे, वंदनाताई काळे, विमलताई कटरे, छबुताई उके, गीताताई लिल्हारे, जितेंद्र कटरे, सभापती विनाताई कटरे, रेखाताई फुंडे, मोठ्या संख्येने स्थानिक ओबीसी नेते व हजारोच्या संख्येने ओबीसी समाज बंधु भगिनी उपस्थित होते.