कार्यकारी संपादक दिनेश मंडपे
मुंबई, दि. 15 सप्टेंबर 2025 :
महाराष्ट्र शासनाने दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा देत संजीव गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत मिळणाऱ्या मासिक आर्थिक सहाय्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत दिव्यांग लाभार्थ्यांना मासिक *₹1500* इतके सहाय्य दिले जात होते. परंतु आता या रकमेतील वाढ करून *₹2500* मासिक आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. हा निर्णय ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार आहे.
या वाढीमुळे राज्यातील सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दिलासा मिळणार असून त्यांना अधिक सक्षमपणे जगण्यास मदत होईल. या निर्णयाचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गातील सर्व पात्र दिव्यांग व्यक्तींना मिळणार आहे.
सरकारने स्पष्ट केले आहे की, हे सहाय्य थेट DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या 03 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून यामुळे हजारो दिव्यांग नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.








