भामरागड तालुक्यात सेवा पंधरवाडा विविध उपक्रमांनी होणार साजरा…

144

भामरागड प्रतिनिधी कवीश्वर मोतकुरवार :

भामरागड:

दिनांक 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत पंतप्रधान मा.श्री. नेरंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने भामरागड तालुक्यात महसूल विभागातर्फे विविध उपक्रम साजरे करण्यात येत आहे.

पांदन रस्ते शोधून त्यांना क्रमांक प्रदान करणे

सर्व ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी आणि महसूल सेवक यांनी प्रत्येक गावात स्थानिक गावक-यांसोबत शिवार फेरी करून सर्व पांदन रस्त्यांची माहिती प्राप्त केली आहे. शिवारफेरी नंतर नकाशावर असलेले पांदन रस्ते 34 आणि नकाशावर नसलेले पांदन रस्ते 124 आढळून आलेले आहेत.

वरील सर्व पांदन रस्त्यांना भुमि अभिलेख विभागा मार्फत मोजणी करून तहसिलदार यांचे मार्फत

विशिष्ट क्रमांक देण्याची कार्यवाही सुरू आहे.

दिनांक 01/01/2011 पूर्वी शासकिय जमिनीवर अतिक्रमण केलेल्या कुटूंबांना सदर शासकीय जमीनीवर

अतिक्रमण नियमानुकूल करून शासकीय पटटयांचा वाटप करणे:-

प्रत्यक्ष अतिक्रमण केलेल्या जागेवरील संबंधितांना ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी आणि महसूल सेवक यांनी भेटी देवून सर्व कागदपत्रांची पडताळणी करून परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही सूरू आहे. आणि ग्रामीण भागातील 46 आणि नगर पंचायत भागातील 172 अतिक्रमण धारकांना नियमानुकूल करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. मा. उपविभागीय अधिकारी ऐटापल्ली यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समिती, सदर प्रस्ताव मान्य करून संबंधीतांना अतिक्रमित जागेचे पटटे देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

नाविण्यपूर्ण उपक्रमः

1. लक्ष्मी मुक्ती योजनाः शेतीच्या 7/12 वर फक्त् पतीचे नाव असेल तर सदर व्यक्तीने ग्राम महसूल अधिकारी यांचेकडे अर्ज आणि संमतिपत्र दिल्यास त्याचे पत्नीचे नाव 7/12 वर सहहिस्सेधारक म्हणून नोंद करण्यात येईल. भामरागड तालुक्यात असे 1140 स्वतंत्र 7/12 आहेत.

2. म.ज.म.सं. 1966 चे कलम 85 नूसार सामूहिक 7/12 वर सहहिस्सेधारक यांनी सदर शेतीची खातेफोड करून शेतीचा स्वतंत्र 7/12 तयार करून स्वतंत्र मालकी हक्क प्रत्येक सहहिस्सेधारकाच्या नाव तयार करता येईल. यामुळे सर्व सहहिस्सेधारकांना शासनाच्या सर्व योजनांचा फायदा स्वतंत्ररित्या मिळेल याकरीता सर्व सामूहिक हिस्सेधारकांनी संबंधी तलाठी यांचेकडे अर्ज सादर करावा. भामरागड तालुक्यात 3818 सहसिस्सेधारक असेलेले 7/12 आहेत. तहसिलदार यामध्ये अंतिम आदेश दिल्यानंतर स्वतंत्र 7/12 तयार होतील.

3. शाळा आणि महावि‌द्यालययात दाखले वाटप करणेः भामरागड तालुक्यातील वर्ग 10 वी, 11 वी, 12 वीतील 905 विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र आणि जन्माचे प्रामणपत्र सर्व शाळांमध्ये कॅम्प चे आयोजन करून वाटप करण्यात येणार आहे. त्याकरीता सर्व मुख्याध्यापक आणि सेतू केंद्र चालक यांची सभा घेवून दाखले वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.