सहसंपादक श्याम मशाखेत्री
चंद्रपूर: संजय गांधी निराधार व श्रावण बाळ लाभार्थ्यांना दरमहा मिळणारे अनुदान गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले आहे.अनुदान न मिळाल्यामुळे या योजनेचे लाभार्थी त्रस्त झाले आहेत.ही बाब लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष श्री.राहुल भाऊ देवतळे यांनी अनुदान त्वरित मिळावे याकरिता जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.लाभार्थ्यांचे अनुदान रखडले असल्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे.विषयाचे गांभीर्य लक्षात घेता त्यांचे रखडलेले अनुदान लवकरात लवकर मिळवून देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे करण्यात आली आहे.यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष श्री.राहुल भाऊ देवतळे,विद्यार्थि जिल्हा कार्याध्यक्ष सागर तामगाडगे ,मंथन नगराळे,सुहास पिंगे,मारोती झाडे,मनोज बंडीवार,अभय राऊत व अनेक निराधार लाभार्थी उपस्थित होते.लाभार्थ्यांना अनुदान न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे..







