जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना दारू पार्टी भोवली.आम आदमी पक्षाने आणली उघडकीस…

171

 

सहसंपादक श्याम मशाखेत्री

चंद्रपूर: जिल्हा परिषद चंद्रपूर चे काही सुशिक्षित कर्मचारी यांनी इंजिनीअर्स डे च्या दिवशी शासकीय विश्राम गृह वसंत भवन इथे दारू पार्टी चा बेत आखला होता.ही माहिती आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयुर राईंकवार यांना मिळाली.त्यांनी सोबत पक्षाचे कार्यकर्ते यांना सोबत घेऊन तिथे प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली असता त्यांना हा दारू पार्टीचा प्रकार लक्षात आला.जिल्ह्यात भ्रष्टाचाराचे जाळे वाढले असून शासकीय वेळेत दारू पार्टी करणे हा गैर जबाबदार पणाचा आणि जनतेच्या विश्वासघाताचा प्रकार आहे. कठोर कारवाई करण्यात यावी.मयुर राईंकवार जिल्हाध्यक्ष यांची ठाम भूमिका.दारू पार्टीत सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यावर जिल्हा परिषद चे सिईओ पुलकित सिंह यांनी कठोरात कठोर कारवाई करून अश्या बेजबाबदार कर्मचाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी पक्ष्याचा वतीने करण्यात आली आहे. अन्यथा आम आदमी पक्षाचे वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असा इशारा देण्यात आला आहे.काही दिवसा आधी आम आदमी पक्षाने मुख्य अभियंता विवेक पेंढे यांचा लाचखोरीचा व्हिडिओ उघड करून त्यांना निलंबित केले आहे. या धाडीत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयुर राईंकवार ,युवा जिल्हाध्यक्ष. राजु पुढे,महानगर अध्यक्ष. योगेश गोखले,शहर संघटन मंत्री.संतोष बोपचे हे उपस्थित होते.